एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सक्षम, केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत कंपनी मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो, असंही अजित पवार म्हणाले.
पुणे : कोरोनाशी लढण्यासाठी राज्याकडे पुरेसा पैसा आहे. यासाठी केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य त्यासाठी सक्षम आहे. केंद्र सरकार कोरोनाबाबत महाराष्ट्राशी संपर्कात आहे. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री सातत्यानं संपर्क करत आहेत, असं देखील त्यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे. जिथं आवश्यक आहे तिथं सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, विवाह, अंत्यविधीप्रसंगी होणारी गर्दी टाळली पाहिजे, असंही ते म्हणाले.
आयकर रिटर्न, जीएसटी भरण्याची मुदत वाढवा, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं आहे. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील, असंही ते म्हणाले.
आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं अजित पवार म्हणाले.
ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत कंपनी मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो, असंही अजित पवार म्हणाले.
शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर
कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत तसेच मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील. रात्री 12 वाजेपासून हे आदेश अंमलात येतील असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement