एक्स्प्लोर

Video: 'सुवर्ण'संधी... सोने मुंबईत 5 हजार, पुणे, जळगावात 3 हजाराने स्वस्त, तुमच्या शहरातील दर किती?

सोनं हे सौभाग्याचं लेणं आणि एक भावनिक दागिना म्हणून हिंदू संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळेच, कुटुंबातील मोठ्या कार्यक्रमात, शुभ कार्यात सोनं खरेदी केली जाते.

मुंबई : केंद्र सरकारचा यंदाच्या लोकसभा हंगामातील पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला. त्यानंतर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यातच, सोन्याच्या (Gold) दरात तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे. कस्टम ड्युटी तात्काळ प्रभावाने लागू होत असते, त्यामुळे अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर कस्टम ड्युटी कमी करुन ग्राहकांना सुवर्णसंधीच दिली आहे. त्यानुसार, राजधानी मुंबईत (Mumbai) सोन्याचे दर तब्बल 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर, पुणे (Pune) आणि जळगाव शहरातही 3 हजार रुपयांनी प्रतितोळा सोने दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदी आनंद पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे, ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. आता, दर कमी झाल्यामुळे पुन्हा सोन्याच्या दुकाना ग्राहकांची गर्दी दिसून येईल.  

सोनं हे सौभाग्याचं लेणं आणि एक भावनिक दागिना म्हणून हिंदू संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळेच, कुटुंबातील मोठ्या कार्यक्रमात, शुभ कार्यात सोनं खरेदी केली जाते. विशेष म्हणजे साडेतीन मुहूर्तांवर सोनं खरेदी करण्याचीही प्रथा, परंपरा आजही जपली जाते. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया या दिवशी सराफ बाजारात ग्राहकांची चलती असते. त्यातच, लगीन सराईही सोनं खरेदीचा सुवर्णकाळ असतो. मात्र, गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरातील वाढ, पाहता ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. मात्र, आजच्या बजेटमधील निर्णयामुळे पुन्हा ग्राहकांना सोनं खरेदीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.  

सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे, ती 9 टक्क्यांवर खाली आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबई 5 हजार रुपयांनी सोने स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावात 5 हजार रुपयांची घट झाल्याचं गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आणि मुंबईतील सुवर्ण व्यापारी कुमार जैन यांनी सांगितलं. आता लगीन सराईचा सिझन आहे, त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. सध्या पावसाळा असल्याने आणि सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सोन्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, या निर्णयामुळे सोने खरेसाठी चांगली संधी मिळाली आहे. त्यातच, लगीन सराई सुरू होणार असल्याने आता सोनं खरेदी करुन ग्राहकांनी सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे, ससेही कुमार जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर 2485 डॉलर होते, ते आता 2407, 2405 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळेही सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं कुमार जैन यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई, पुणे, जळगाव या प्रमुख शहरांसह राज्यातील सर्वच शहरात, गावांत सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. त्यामुळे, आपल्या परिसरातील सुवर्णपेढीत जाऊन किंवा ओळखीच्या ज्वेलर्सकडून तुम्ही आजचे सोन्याचे दर जाणून घेऊ शकता.

नेमका काय बदल झाला?

सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के

प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के

अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. 

तुमच्या शहरातील सोन्याचं नवे दर

सोलापूर 

सोने 
(आधी) - 73500
(नंतर) - 71500 (अंदाजे)

चांदी 
(आधी) - 92000 
(नंतर) - 91000 (अंदाजे)


बुलढाणा 

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे खामगाव येथील देशभरातील प्रसिद्ध चांदीच्या आणि सोन्याच्या बाजारपेठेत सोन्याचे आणि चांदीच्या भावात मोठी घट झाल्याने व्यापारी सांगत आहेत

चांदी - काल - 91650 प्रति किलो.
        - आज - 84330 प्रति कीलो.

सोने - काल - 73000 प्रति 10 ग्रॅम.
       - आज - 68000 प्रति 10 ग्रॅम.


वाशिम सोने चांदी दर

सोनं - आधी  73,500  आता 70,500

चांदी - आधी 92 हजार
 आता - 86 हजार

परभणी

सोने
काल 73200 रुपये 
आज 71000 रुपये

चांदी

काल-89500 किलो 
आज-87500 किलो

अमरावती

सोनं - आधी  73400   
          आता 71300

चांदी - आधी  91000 
          आता - 88000

हिंगोली 

सोने ( प्रती तोळा)
अगोदर 74000
आता 71700

चांदी( प्रती किलो)
अगोदर  92000
आता  88000

नांदेड 

सोनं बजेट अगोदर होते 74,400 
सोन बजेट नंतर :- 71800

चांदी बजेट अगोदर 91400
चांदी बजेट नंतर 88000

 

सोन्याचे भाव (पुणे)

आधीचे: 72,500 रुपये

आत्ताचे: 69,500 रुपये

चांदीचे भाव (पुणे)

आधीचे: 89,600

आत्ताचे: 85,600

गोंदिया जिल्ह्यात 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 

 काल 73 हजार 500 होता..
 
आज 69 हजार 500 रुपये आहे..


 चांदीचा भाव 

काल 92000 होता..

आज 87590 आहे..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget