एक्स्प्लोर

Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?

Sameer Wankhede likely transferred from NCB : मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sameer Wankhede Likely Transferred From NCB : मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याबाबत अनेक पुरावे सादर केले. शिवाय या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनीही गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. या सर्व प्रकरणात समीर वानखेडे यांची मुंबईत एनसीबी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच अचानक समीर वानखेडे यांनी दिल्लीतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण आणि बॉलिवूडमधील कलाकारांची चौकशीमुळे समीर वानखेडे चर्चेत आले. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली.  त्यातच दिल्लीमधील एनसीबी कार्यालयातून समीर वानखेडे यांना बोलवणं आलं. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली. डीजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (DG narcotics control bureau )यांनी समीर वानखेडे यांच्यावर विभागीय चौकशी लावली आहे. त्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी होत असेल तर त्याला त्या पदावर राहाता येत नाही. जोपर्यंत याचा काही निर्णय येत नाही तोपर्यंत त्या पदावरुन दूर करण्यात येतं. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासापासूनही त्यांना दूर केलं जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मुंबईतील हायप्रोफाइल ड्रग्ज प्रकरणामुळे दिल्लीतील एनसीबी कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज त्यांनी एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. दिल्लीतील एनसीबी कार्यालयाबाहेर समीर वानखेडे यांचे समर्थकांनी गर्दी केली आहे. पोस्टर घेऊन वानखेडे यांना पाठींबा व्यक्त करत आहेत. नवाब मलिक यांच्यावर आरोप करणारे पोस्टरही कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहेत. 

संबधित बातम्या :

Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा 

मी दिलेला दाखला खराच, समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली : नवाब मलिक

Nawab Malik vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या बदली प्रकरणात अमित शाह कनेक्शन? नवाब मलिकांना मिळालेल्या पत्रात खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Embed widget