एक्स्प्लोर

Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा

Nawab Malik vs Sameer Wankhede : चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे.

Nawab Malik vs Sameer Wankhede : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी एका अज्ञात एनसीबी आधिकाऱ्याकडून मिळालेलं पत्र ट्विटर पोस्ट केलं आहे. या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं असून एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या क्रूज प्रकरणाचाही 26 केसेसचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलेय की,  "केस  क्रमांक 94/2021 मध्ये Cordeilia क्रूझवरील केसमधील पंचनामे एनसीबी कार्यालयात झाले. भाजपच्या इशाऱ्यावर सर्व कारवाई झाली. दोन जणांच्या मदतीनं समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पुरावे पेरले. क्रूजवर  NCB कर्मचारी विश्व विजय सिंग, आशीष रंजन किरण बाबू, विशावनाथ तिवारी व सुधाकर शिंदे, OTC कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे , विष्णू मिना, ड्रायव्हर अनिल माने आणि खासगी सचिव शरद कुमार व अन्य कर्माचाऱ्यांनी आपल्या सामानात लपवून ड्रग्ज नेहले. संधी साधून लोकांच्या सामानात ड्रग्ज लपवले गेले. समीर वानखेडे यांना छापेमारीदरम्यान बॉलिवूड कलाकार, मॉडेल अथवा सेलिब्रेटी मिळाल्यास जबरदस्ती तो ड्रग्ज असल्याचं दाखवून फसवतो अन् केस तयार करतो. समीर गेल्या महिन्याभरापासून भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांसोबत (के. पी गोसावी आणि मनिष भानूशाली) संपर्कात आहेत.  क्रूजवर जितक्या लोकांना पकडलं, त्या सर्वांना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं. सर्व पंचनामे एनसीबीच्या कार्यालयात करण्यात आले. दिल्लीवरुन फोन आल्यानंतर रिशब सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्नीचारवाला यांना त्याच रात्री सोडण्यात आलं.  याप्रकरणात समीर वानखेडे यांची कॉल डिटेल्स चेक करु शकता. या प्रकरणात आरबाज मर्चंट याचा मित्र अब्दुलजवळ ड्रग्ज मिळालं नव्हतं. पण समीर वानखेडे यांनी ड्रग्जची खोटी केस केली. समीर वानखेडे यांनी या प्रकरणात आपला वाहन चालक विजय याला पंच केलं आहे. नियमांनुसार, साक्षीदार स्वतंत्र असायला हवा. हे सर्व प्रकरण बनावट आहे. या प्रकरणात मिळालेलं ड्रग्ज समीर वानखेडे यांनी पेरलेलं आहे."

एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्यानं नवाब मलिक यांना पाठवेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत... 26 केसेसशिवाय इतरही आरोप करण्यात आले आहेत... 

 पाहूयात काय आहेत आरोप

1) समीर वानखेडे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत चार प्रमाणिक एनसीबी आधिकाऱ्यांना निलंबीत केलं.

2) राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरुन समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला टार्गेट केलं. कोट्यवधी रुपये वसूल केले. वकील अयाज खान यांच्यामार्फत पैसे गोळा केले. महनियाला बॉलिवूड कलाकारांकडून वसूली केली जाते. या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती व अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे.

3) समीर वानखेडे वसूली अधिकारी आहे. प्रसारमाध्यमात राहण त्याला आवडतं. त्यासाठी तो निर्दोष लोकांना फसवतो. यासाठी 13 जणांची टीम बनवली आहे. 

4) समीर वानखेडे यांच्या मुंबई बदलीप्रकरणामध्ये अमित शाह यांचं कनेक्शनही पत्रात सांगितलेय. 

5) पाळलेल्या गुंडाच्या मार्फत ड्रग्ज खरेदी करुन खोट्य केसेस करत आहे.  लोकांकडे ड्रग्ज पेरले जात होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात होती. 

6) समीर वानखेडे यांनी मुंबईत कार्यभार सांभाळल्यापासून अटक केलेल्या 25 जणांकडून कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या. आपल्या मर्जीने पंचनामा बदलला. 

7) समीर वानखेडे यांच्या केबिनमध्ये थोड्याप्रमाणात ड्रग्ज असेल. 

8) समीर वानखेडे आपल्या वसूलीतील काही रक्कम वरिष्ठ आधिकाऱ्यालाही देतो.

9) समीर वानखेडे यांनी पकडलेल्या सर्व आरोपींची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल.

10) महाराष्ट्र सरकारने समीर वाखेडे यांच्यावर तपास समिती नेमावी, सत्य समोर येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget