एक्स्प्लोर

Bomb Threat : ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपी अटकेत

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये (Hotel Taj) बॉम्ब ठेवल्याचा  फोन (Bomb scare) करणाऱ्या कॉलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.  मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये (Hotel Taj) बॉम्ब ठेवल्याचा  फोन (Bomb scare) करणाऱ्या कॉलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाने  असे कृत्य का केले याचा पोलीस तपास करत आहे.

मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करून ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचं म्हटलं.  ताज हॉटेलमध्ये बॉम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करा, असे देखील तो या वेळी म्हणााला. यानंतर अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. पोलिसांनी ताज हॉटेलची तपासणी केली मात्र तासाभरानंतरही काहीही निष्पन्न झाले नाही.  त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

धरमपाल सिंह (36 वर्षे) असे तरूणाते नाव आहे. तो नवी दिल्ली येथील  लक्ष्मीनगर भागातील रहिवासी आहे. बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी कॉलरचा नंबर तपासला.  तर त्याने फायर ब्रिगेड कंट्रोलला कॉल करण्यापूर्वी 28 वेळा मुंबई पोलिस कंट्रोलला कॉल केल्याचे दिसून आले. मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी कॉलरवर आयपीसीच्या कलम 506(2) अन्वये गुन्हा दाखल केला आणि कॉलरला दिल्लीतून अटक केली. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून फोन करणाऱ्याने व्यक्तीने असा फोन का केला याचा शोध घेत आहेत.

अनेक वेळा धमकीचे फोन

मुंबई पोलिसांना यावर्षी अनेक अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत.  यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं. 

ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

6 ऑगस्ट रोजीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली होती. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी करण्यात आली होती.

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget