एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BMC Water Price:  मुंबईकरांचं पाणी महागणार; 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता

BMC Water Price:  येत्या 16 जूनपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

BMC Water Price:  आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai) आता महागाईची (Inflation) आणखी झळ बसणार आहे. मुंबईच्या पाणीपट्टीत सहा ते सात टक्के वाढ (Mumbai Water Price) होणार आहे. येत्या 16 जूनपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे (BMC Commissioner) अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा (Upper Vaitarna ) आणि भातसा तलावातून (Bhatsa)  उपसण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत असलेली वाढ, या सगळ्यांचा विचार करून मुंबईची पाणीपट्टी सहा ते सात टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. प्रतिवर्षी आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने याआधीच प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार आता, पाणीपट्टी दरात वाढ होणार आहे. प्रति हजार लीटर मागे 25 पैसे ते चार रुपयांची दरवाढ होणार आहे. 

दरवाढीचा पुनर्विचार होणार?

आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि प्रशासकाकडे असलेला कारभार पाहता दरवाढीचा निर्णय होणार की दरवाढीच्या प्रस्तावाचा पुनर्विचार होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईकरांसाठी मागील काही दिवसांपासून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

सोमवारी 16 तासांसाठी पाणीकपात 

जलवाहिन्याच्या कामासाठी सोमवारी (5 जून 2023) ला अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

अंधेरी पूर्व येथील महाकाली गुंफेजवळील बीडी सामंत मार्ग चौकात नवीन 1500 मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे आणि 1200 मिमी पार्ले आउटलेटला जोडण्याचे काम सोमवारी करण्यात येणार आहे.  जलवाहिनी जोडण्याचे काम सोमवारी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पालिकेच्या जल अभियांत्रिकी विभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. पाइपलाइन जोडणी व दुरुस्तीचे काम 16 तास चालणार आहे.

पाहा व्हिडीओ: Mumbai: मुंबईच्या पाणीपट्टीत 6 ते 7 टक्क्यांनी वाढ होणार

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget