एक्स्प्लोर
दोन दिवसात मुंबईतील 137 बेकायदा हॉटेलवर हातोडा
कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये घडलेल्या अग्नितांडवानंतर महापालिकेने 30 आणि 31 डिसेंबर रोजी धडक कारवाई करुन सुमारे 650 हॉटेलवर कारवाई केली.
मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवानंतर मुंबईतील बेकायदेशीर हॉटेलवरील कारवाईला पुन्हा सुरुवात झाली आहे. दोन दिवसात 137 बेकायदेशीर हॉटेलवर मुंबई महापालिकेने हातोडा चालवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 800 हॉटेलची तपासणी करुन 137 हॉटेलमधील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला आहे.
कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये घडलेल्या अग्नितांडवानंतर महापालिकेने 30 आणि 31 डिसेंबर रोजी धडक कारवाई करुन सुमारे 650 हॉटेलवर कारवाई केली. परंतु त्यानंतर ही कारवाई थांबवून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व हॉटेलना 15 दिवसांची मुदत देऊन, वाढीव बांधकाम तोडण्याच्या सूचना करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.
परंतु त्यानंतर दोनच दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाची एनओसी तपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व हॉटेल आणि पबची तपासणी करुन पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अग्निशमन दल, आरोग्यविभागाचे अधिकारी, इमारत आणि कारखाने विभागाचे प्रत्येकी एक अधिकारी याप्रमाणे पथक तयार करुन ही धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार 24 विभाग कार्यालयात 2 दिवसांमध्ये 796 हॉटेल आणि पबची तपासणी करण्यात आली. यामधील 137 हॉटेल्समध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचं आढळून आल्यावर ते तोडण्यात आले.
या हॉटेलवर कारवाई
यामध्ये जाफरभाई दिल्ली दरबार, ग्रँट रोड येथील फाईव्ह स्पाईस, माटुंगा येथील शारदा भवन स्वागत, गार्मीश, रॉयलस्टोन, लोअर परळ-वरळीमधील जाफरान तोडी, होपीपोळा, वूडसाईड, किचनस्वेअर, लेडीबागा, कॅफेझू, व्हेवरपॉट, ग्रँड मामा, फाटीबाव, दादर-माहिममधील लक्ष्मी, लीना, तंदूर, गोल्डन, अपना, शगुन, वेलकन, वांद्र्यातील टॅब, मुगल तडका, अंधेरी पूर्व भागात मनमंदी फरसाण, विश्वास फरसाण, गार्डन, गोरेगावमधील कोळी किचन, ग्रीन्स, मालाडमधील सुलभी, फेमस वडापाव, कुर्ला येथील जमजम हॉटेल, आनंद फरसाण मार्ट, देवनारमधील गरीब नवाज, घाटकोपरमधील न्यू चायना टाऊन, नयकार, अचीजा, मुलुंडमधील वूडलँड, उमा पॅलेस, रुची, बावर्ची, बोरीवलीतील केणी, ग्रीन अंकल, सारस्वत, सिम्पली, गोडबोले, निलम, शिवम, बे व्हयू, दहिसरमधील फिसी, पायल, गोल्डन प्लेट, कोकण स्वाद, कृष्णा व्हेज या हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement