एक्स्प्लोर

BMC : मुंबई महापालिकेकडून 4,856 कोटींचा मालमत्ता कर जमा, यंदा 108 टक्के कर जमा

BMC Property Tax : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे 4500 कोटी रुपये मालमत्ता कर संकलित करण्याचे उद्दिष्ट होते, पण त्याहून 356 कोटी रुपये अधिक म्हणजे 108 टक्के कर संकलन झालं आहे. 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा ४,८५६.३८ कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४,५०० कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्याहून सुमारे ३५६.३८ कोटी रुपये अधिक म्हणजे १०८ टक्के कर संकलन करून कर निर्धारण आणि संकलन विभागाने उत्तम कामगिरी नोंदवली आहे. तसेच, या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. या अंतिम दिनांकापर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकाना आता दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ चा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. मालमत्ता धारकांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळता यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदीद्वारे सातत्याने आवाहन करण्यात आले. करभरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रे रविवारी, शनिवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

या पार्श्वभूमीवर, करनिर्धारण व संकलन खात्याकडून यंदा ४,८५६.३८ कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामध्ये शहर विभागातील १ हजार ४२५ कोटी ०१ लाख ३१ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील २ हजार ४५५ कोटी ९० लाख ५७ हजार रुपये आणि पूर्व उपनगरातील ९६८ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये तसेच शासकीय, बंदर आणि रेल्वे यांच्या अखत्यारीतील मालमत्ताच्या १० कोटी ४८ लाख २१ हजार इतक्या कर रकमेचा समावेश आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या ४,५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक (१०७.९५ टक्के) कर संकलित करण्यात आला आहे. दिनांक २५ मे २०२४ रोजी १७०.५९ कोटी तर, दिनांक २६ मे २०२४ रोजी १.५२ कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला.

विभागनिहाय मालमत्ता कर संकलनाची आकडेवारी

ए विभाग- २१४ कोटी ९१ लाख ४९ हजार रुपये

बी विभाग- ३३ कोटी ९५ हजार ०२ लाख रुपये

सी विभाग- ६१ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये

डी विभाग- १९३ कोटी ०२ लाख ४३ हजार रुपये

ई विभाग- १०५ कोटी २६ लाख ३४ हजार रुपये

एफ दक्षिण विभाग- १०० कोटी २६ लाख ३४ हजार रुपये

एफ उत्तर विभाग- ११४ कोटी १९ लाख २८ हजार रुपये

जी दक्षिण विभाग- ४१९ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये

जी उत्तर विभाग- १८२ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपये

एच पूर्व विभाग- ४५६ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपये

एच पश्चिम विभाग- ३०१ कोटी २४ लाख ८१ हजार रुपये

के पूर्व विभाग- ४६३ कोटी ५८ लाख ०१ हजार रुपये

के पश्चिम विभाग- ४०६ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये

पी दक्षिण विभाग- २७० कोटी ४० लाख  २५ हजार रुपये

पी उत्तर विभाग- १८० कोटी ७२ लाख २२ हजार रुपये

आर दक्षिण विभाग- १४३ कोटी ८९ लाख ७६ हजार रुपये

आर मध्य विभाग- १७० कोटी १९ लाख ९८ हजार रुपये

आर उत्तर विभाग- ६२ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये

एल विभाग विभाग- २११ कोटी ३० लाख ४५ हजार रुपये

एम पूर्व विभाग- ७३ कोटी ३१ लाख ५५ हजार रुपये

एम पश्चिम विभाग- १०३ कोटी ३४ लाख ११ हजार रुपये

एन विभाग विभाग- १६१ कोटी ६१ लाख ९८ हजार रुपये

एस विभाग विभाग- २८२ कोटी ३० लाख ४४ हजार रुपये

टी विभाग विभाग- १३६ कोटी २५ लाख ०५ हजार रुपये

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special ReportUddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special ReportMumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्तDevendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget