एक्स्प्लोर
VIDEO : भाजपच्या महिला शहराध्यक्षाच्या दिराचा हवेत गोळीबार
ज्या मिरवणुकीत आशिष भोईरने हवेत गोळीबार केला, ती मिरवणूक देवी विसर्जनाची होती.
अंबरनाथ : अंबरनामधील भाजपच्या महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर यांचा दिर आशिष भोईरने हवेत गोळीबार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात हवेत गोळीबार करताना आशिष भोईर स्पष्टपणे दिसत आहे.
एक ऑक्टोबर रोजी मिरवणुकीत नाचताना आशिष भोईरने हवेत गोळीबार केला. या मिरवणुकीत भाजपच्या महिला शहराध्यक्ष सुजाता भोईरही नाचताना दिसत आहेत.
आशिष भोईर या भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांचे दिर आहेत.
ज्या मिरवणुकीत आशिष भोईरने हवेत गोळीबार केला, ती मिरवणूक देवी विसर्जनाची होती, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. मिरवणुकीबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement