एक्स्प्लोर

MNS New Flag | मनसेच्या भगव्या झेंड्यामागे शरद पवारांचं डोकं, भाजपचा दावा

मनसेच्या भगव्या झेंड्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र मनसेच्या भगव्या झेंड्याचा सर्वाधिक धक्का भाजपला बसेल असं बोललं जात आहे. मात्र असं ज्यांना वाटत असेल ते चुकीचे असल्याचा टोला भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी लगावला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं.अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरणामागे राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं डोकं असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.

हिंदू मतांच्या विभाजनासाठी शरद पवार चाणाक्षपणे मनसेचा वापर केला. शरद पवारांनी राज ठाकरेंचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली, म्हणून मनसे भगवी होत आहे. हिंदूधर्म किंवा महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली राज ठाकरेंना शक्ती देण्याचं काम शरद पवार करत आहेत. मात्र यामुळे भाजपचं नुकसान होईल, असं कुणाला वाटत असेल ते चुकीचे असल्याचा टोलाही गणेश हाके यांनी लगावला आहे.

मनसेचा झेंड्याच्या रंग बदलण्याचा प्रयोग फेल जाणार आहे. भाजपला वैचारिक गोंधळ असलेले तकलादू मित्र नकोत. देशात आणि राज्यात आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होऊ शकतो. मनसे आणि भाजप यांच्या कामात मतभेद आहेत. मनसेने आमचा विचार स्वीकारला तर मैत्रीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, याची आठवण हाके यांनी करुन दिली. वंचित बहुजन आघाडी भाजपची टीम बीचा प्रयोग करण्याची गरज नाही. मात्र मनसे राष्ट्रवादीची बी टीम म्हणून काम करत आहे, असा आरोप हाके यांनी केला.

कसा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा?

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसsच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.

अमित ठाकरे यांचं राजकारणात लॉन्चिंग

आजच्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पूत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात लॉन्चिंग करण्यात आलं. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांच्या लॉन्चिंगची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, बहिण उर्वशी, आजी कुंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. परंतु राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. ते एका खोलीत बसून हा प्रसंग पाहत होते.

संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ravi Rana Amravati Lok Sabha : जिल्ह्यासाठी नवनीत राणा अन् देशासाठी मोदीजी जरुरीVishal Patil vs Chandrahar Patil Sangli : सांगलीचे दोन पैलवान समोरा-समोर, विशाल आणि चंद्रहारची भेटManoj Jarange Voting : रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर,  मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्कLok Sabha Election Phase 2 Voting  :  राजश्री पाटील यांचं कुटुंबीयांनी औक्षण केलं : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
IPL 2024 Virat Kohli And Rinku Singh: तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
तुझी शपथ भाई...रिंकू सिंग होता अस्वस्थ; कोहली ओरडलाही, आता आनंद गगनात मावेना, पाहा Video
Embed widget