शरद पवारांना चुकीची माहिती दिली, अनिल देशमुखांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न फसला : देवेंद्र फडणवीस
शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे खोडून काढले. देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतली गेली. अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पोलीस विभागाच्या कागदत्रांनुसार अनिल देशमुख कोरोनाची लागण झाली त्या दरम्यान कुठे कुठे गेले याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनिल देशमुख 17 फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृह येथे येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख निवासस्थानी जाणार असल्याचं माहिती आहे. या कार्यक्रमानुसार ते गेले की नाही याची माहिती नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख आयसोलेशनमध्ये नव्हते
15 ते 27 फेब्रुवारी या तारखेदरम्यान अनिल देशमुख आयसोलेशनमध्ये नव्हते. त्यांना या काळात अनेक मंत्री, अधिकारी भेटले आहेत. अनिल देशमुख यांना या काळात कोण कोण भेटलं ही माहिती शोधून काढणे सहज शक्य आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Sharad Pawar | आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार
बदल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार
देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
एक पत्र अन् लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं? : बाळासाहेब थोरात
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह