एक्स्प्लोर
जिल्हा परिषदेत युतीबाबत भाजप कोअर कमिटीची 'वर्षा'वर खलबतं

मुंबई : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात रात्री उशिरा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आयोजित या बैठकीत जिल्हा परिषदेत कुणासोबत युती करावी, याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी यासारखे नेते बैठकीला उपस्थित होते. तब्बल अडीच तास चाललेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणितं जुळवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पण यात शिवसेनेला सोबत घेण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. स्थानिक पातळीवरची स्थिती पाहून सेनेसोबत युतीची चर्चा करण्याचे आदेश जिल्हा स्तरावर देण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे -स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचे आदेश -अनेक जिल्हा आणि पंचायत समितिंमध्ये भाजप-सेना एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा -सत्ता स्थापनेबाबत मुंबईचा गुंता सोडवल्यानंतर आता भाजपाने जिल्हा परिषदमध्ये युतीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक पाउल पुढे टाकले -स्थानिक पातळीवर आधी चर्चा होणार, जिथे निर्णय होणार नाही, तो प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार -अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये कधी नव्हे ते सत्ता समोर उभी ठाकली आहे, मात्र मुंबईच्या निर्णयामुळे अडलं होते - कोणत्या जिल्हा परिषदमध्ये भाजप-सेना यांनी एकत्र येत सत्ता येऊ शकते? भाजप क्रमांक एक असलेले जिल्हे सांगली, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, बुलडाणा,जळगाव, गडचिरोली शिवसेना क्रमांक एक असलेले जिल्हे यवतमाळ, नाशिक, हिंगोली
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग























