एक्स्प्लोर

आगीमुळे भिवंडीच्या गोदामाची इमारत कोसळण्याची भीती

सागर कॉम्प्लेक्समधील बी १ या इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. या आगीत इथली 16 गोदामं जळून खाक झाली असून आग अजूनही विझलेली नाही.

भिवंडी : भिवंडीच्या माणकोलीमधील सागर कॉम्प्लेक्समधील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत. मात्र एकीकडे आगीचं संकट कायम असताना, गोदामाची संपू्र्ण इमारतच कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आगीमुळे या इमारतीला ठिकठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. शिवाय इमारतीचे पिलर्सही कोलमडले आहेत. त्यामुळे आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच ही इमारत स्वतःहून पाडली, तर दुर्घटना टाळता येऊ शकते, असं म्हटलं जात आहे. पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार! सागर कॉम्प्लेक्समधील बी १ या इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. या आगीत इथली 16 गोदामं जळून खाक झाली असून आग अजूनही विझलेली नाही. ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडीतील अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवण्यासाठी दोन दिवस धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. आगीच्या ठिकाणापासून पाण्याच्या टाक्या 8 ते 9 किमी लांब असून, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकमुळे पाणी घेऊन जाण्यास उशीर होत आहे, असं कारण अग्निशमन विभागाने दिलं आहे. भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग भिवंडी अग्निशमनदलाची दूरवस्था भिवंडी अग्निशमनदलात फक्त चार फायर इंजिन आहेत. त्यापैकी तीन फायर इंजिन 12 वर्ष जुने आहेत तर नवीन फायर इंजिन दोन वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. धक्कादायक म्हणजे इथे एकही वॉटर टँकर नाही, त्यामुळे खासगी पाण्याचं टँकर मागवावं लागतं. अग्निशमन दलात एकही अत्याधुनिक गाडी नाही, त्यामुळे आग विझावतान नेहमी ठाणे, कल्याण एमआयडीसीमधून गाड्या आणल्या जातात. यासोबतच फायरमन आणि अधिकाऱ्यांचीही कमतरता आहे. भिवंडीमध्ये महिन्यातून कमीत कमी सहा वेळा मोठी आग लागते, त्यात औद्योगिक वसाहत असल्याने जास्त गरज असूनही महापालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mitchell Starc : दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Inside : शस्त्रसंधीची इनसाईड स्टोरी, भारत-पाकिस्तानचा ताण-तणाव कसा थांबला?Sachin Vanje Family : Ajit Pawar Nanded मधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीलाIndian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PCSatara Jawan Ind vs Pak : सॅल्यूट! हळदीच्या अंगाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्याचा जवान बॉर्डवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mitchell Starc : दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दिल्लीला दे धक्का! भारत सोडताच मिचेल स्टार्कचा मोठा निर्णय, आयपीएल खेळण्यासाठी येणार नाही परत, जाणून घ्या कारण
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
दुचाकींच्या दोन अपघातात 4 जणांचा मृत्यू; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने भीषण दुर्घटना
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC
भारताचा रावळपिंडी एअर बेसवर हल्ला अन् अमेरिकेचे धाबे दणाणले; अणवस्त्र स्फोटाच्या भीतीने ट्रम्प मध्यस्थीला धावले
भारताचा रावळपिंडी एअर बेसवर हल्ला अन् अमेरिकेचे धाबे दणाणले; अणवस्त्र स्फोटाच्या भीतीने ट्रम्प मध्यस्थीला धावले
गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अखेर गुन्हा दाखल, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक
गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा; अखेर गुन्हा दाखल, अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 5 जणांना अटक
'मदर्स डे' असाही... मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते; जंगलातील वाघिणीची बछड्यांसोबत आभाळमाया
'मदर्स डे' असाही... मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते; जंगलातील वाघिणीची बछड्यांसोबत आभाळमाया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2025 | रविवार
Embed widget