एक्स्प्लोर
'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात'
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले.
मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सरकार त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण झालं.
मुंबईतल्या महापौर बंगल्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं.
शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील दिग्गज नेते शिवतीर्थावर आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement