एक्स्प्लोर
Advertisement
गॅस कटरने एटीएम फोडून 10 लाखांवर डल्ला
भिवंडी शहरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चोरट्यांनी रहदारीच्या भिवंडी-वसई मार्गावरील अंजूरफाटा येथील शिवाजीनगरमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 9 लाख 90 हजार 700 रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई: भिवंडी शहरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चोरट्यांनी रहदारीच्या भिवंडी-वसई मार्गावरील अंजूरफाटा येथील शिवाजीनगरमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 9 लाख 90 हजार 700 रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चोवीस तास वाहनांची वर्दळ असणाऱ्या भिवंडी शहरातील अंजूरफाटा शिवाजीनगर येथील कामण-वसई या मुख्य रस्त्यावर युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. त्या ठिकाणी रात्री चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन एटीएम गॅसकटरच्या मदतीने फोडून त्यातील 9 लाख 90 हजार 700 रुपयांची रक्कम चोरी करुन पोबारा केला.
सकाळी एटीएम सेंटर शेजारील किराणा दुकानदार तेथे आल्यावर ही घटना उघडकीस आली. यानंतर या चोरीची माहिती स्थानिक नारपोली पोलीस स्टेशन येथे कळल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम AGS TRASACT TECHHNOLOGIES कंपनीचे असून कर्मचारी प्रशांत भट यांनी याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement