एक्स्प्लोर
चिल्लर लोक चिल्लरपणा करणार : आशिष शेलार
मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टरवरुन आता शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. चिल्लर लोक चिल्लरपणा करणार, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी आशिष शेलार यांनी रंगशारदा सभागृहात उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार अशी घोषणा खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. यानंतर सोमय्या यांची खिल्ली उडवणारं पोस्टर काल भाजप प्रदेश कार्यालयासमोर लावलं होतं.
यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "कोणत्याही पक्षाने त्या पोस्टरखाली नाव लिहिण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे. पण चिल्लर लोक चिल्लरपणा करणार, त्याला आम्ही बाजूला ठेवतो."
मात्र याच कार्यक्रमाच्या ठिकाणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. किरीट सोमय्यांची खिल्ली उडवणारे पोस्टर कुणी लावले माहित नाही. आशिष शेलार काय म्हणाले, त्यांनी कोणता चिल्लरपणा केला, की आणखी कोणी केला, हे मला माहित नाही. पण आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ, असं वायकर म्हणाले.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement