एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : अमित ठाकरेंची राजकारणात लवकरच ग्रँड एंट्री?

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंना लवकरच एखादी राजकीय जबाबदारी दिली जाऊ शकते. पक्षातील नेत्यांच्या मागणीमुळे अमित ठाकरेंवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याचं पदार्पण होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच राजकारणात ग्रँड एंट्री करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंना लवकरच एखादी राजकीय जबाबदारी दिली जाऊ शकते. पक्षातील नेत्यांच्या मागणीमुळे अमित ठाकरेंवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे. यासाठी पक्षात तयारी सुरु आहे. पक्षाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अमित ठाकरे मुंबईतील विविध शाखांना भेट देत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये अगोदर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नंतर उद्धव आणि राज ठाकरे आणि आता तिसऱ्या पिढीची एंट्री होणार आहे. तिसऱ्या पिढीमध्ये सर्वात अगोदर आदित्य ठाकरे यांनी एंट्री केली. त्यांच्यानंतर आता अमित ठाकरेही राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्पेशल रिपोर्ट : अमित ठाकरेंची राजकारणात लवकरच ग्रँड एंट्री? मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएट असलेले अमित ठाकरे सध्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र त्यांना राजकारणात आणण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या महिन्यातच झालेल्या पक्षाच्या बैठकीत बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेत्यांनी अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी केली. ज्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे मुंबईतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. अमित ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीवर पक्षातील कुणीही बोलायला तयार नाही. मात्र अमित ठाकरे यांची जी लोकप्रियता आहे, तिला राजकारणाशी जोडलं जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 2012 साली महापालिका निवडणुकीत अमित ठाकरे प्रचार करताना दिसून आले होते. मात्र त्यांच्यावर कोणती जबाबदारी नव्हती. पुन्हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मनसेसाठी प्रचार केला होता. स्पेशल रिपोर्ट : अमित ठाकरेंची राजकारणात लवकरच ग्रँड एंट्री? अमित ठाकरेंनी सोशल मीडियाचाही वापर सुरु केला आहे. 2017 मध्ये महापालिका निवडणुकांच्या काळात ते आजारी होते. मात्र आजारातून बाहेर पडल्यानंतर ते आता सक्रिय राजकारणात दिसून येत आहेत. याचवर्षी त्यांचा बालपणाची मैत्रिण फॅशन डिझायनर मितालीसोबत साखरपुडा झाला आहे. अमित ठाकरे आता विद्यार्थ्यांच्या विषयांना हाताळताना दिसत आहेत. अमित ठाकरेंनी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात मोठा फरक असला तरी ते काही गोष्टींमध्ये वडिलांच्या मागे नाहीत. अमित ठाकरेही एक चांगले व्यंगचित्रकार असून स्केचिंगही करतात. ते फुटबॉल प्रेमी असून स्वतः फुटबॉल खेळतात. फुटबॉल स्टार रोनाल्डिनोला भारतात आणण्यात अमित ठाकरेंची मोठी भूमिका होती. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेतून राजकारणाची सुरुवात केली, त्याच पद्धतीने अमित ठाकरेही मनसे विद्यार्थी सेनेतून राजकारणात एंट्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या निर्णयाची...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरी बाणा सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा...! कोल्हापुरात गोकुळ मोर्चाला सुरुवात, महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांचा संताप
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरी बाणा सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा...! कोल्हापुरात गोकुळ मोर्चाला सुरुवात, महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांचा संताप
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Embed widget