Ajit Pawar: 'आमची मते होती 42 पंरतू आम्हाला 47 मते पडली...', दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?
महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत.
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) यांच्या गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदारांचं संख्याबळ होतं. विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत. आमची मते 42 होती, पंरतू आम्हाला 47 मते पडली आहेत. ज्यांनी आमच्या उमेदवारांनी मते दिली त्यांचे मी आभिनंदन करतो. त्यांनी दिलेल्या विश्वासाला आमचे आमदार निश्चितपणे पात्र राहून पुढची वाटचाल करतील. जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
या निवडणुकीकडे जनतेचं लक्ष लागलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या. आमच्याकडे मते 42 होती. मात्र, त्यापेक्षा आधिक मते आम्हाला मिळाली आहेत. आमदारांनी आपली मते आमचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना दिली त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आमचे दोन्ही आमदार पात्र ठरतील. विधीमंडळात योग्य पध्दतीने काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका ते योग्य पध्दतीने मांडतील आणि प्रशेन सोडवतील असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आमच्याकडे मते कमी होती. मात्र, अपक्ष आणि काही आमदारांनी आपली भूमिका स्वीकारली त्यातून आमचे आमदार निवडून आले आहेत. आम्ही आमची जबाबदारी वाटून घेतली होती. ती सर्वांनी पुर्ण केली आहे. आगामी विधानसभेत देखील असंच एकत्रित काम करू आणि विजय मिळवू असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
कोणकोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26