एक्स्प्लोर
Advertisement
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश
गेल्या काही महिन्यांपासून हसीन जहाँ पतीवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. संजय निरुपम यांनी हसीन जहाँचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं.
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीन जहाँचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केलं. गेल्या काही महिन्यांपासून हसीन जहाँ पतीवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद आहे. हसीन जहाँने शमीवर अनैतिक संबंधांचा आरोप करत कौटुंबीक हिंसाचाराचेही आरोप केले आहेत. तिने शमीविरोधात कोलकात्यामधील अलीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती.
शमीवर त्याच्या पत्नीने मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे बीसीसीआयने आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून शमीचं नावही वगळलं होतं. पण नंतर चौकशीत हे आरोप निराधार असल्याचं सिद्ध झाल्यानंतर शमीचं नाव पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेण्यात आलं.
हसीन जहाँने मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप हसीन जहाँने केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement