एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 13/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 13/08/2018

- धनगर समाजाचा आरक्षणासाठी राज्यभर एल्गार, नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको, नागपूरमध्ये आंदोलकांसोबत शेळ्या-मेंढ्याही रस्त्यावर, जालना-औरंगाबाद महामार्ग तीन तास ठप्प, तर सांगलीत आटपाडी एसटी डेपो बंद https://goo.gl/8r7xpF
- वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने फडणवीसांच्या वाहनावर 13 हजारांचा दंड, अद्याप दंडाची वसुली नाही https://goo.gl/LJBbKe
- शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप, पदाधिकारी जगदीश शेट्टींची पक्षातून हकालपट्टी https://gl/Zs19vX
- नवी दिल्लीमध्ये जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ला, अज्ञाताकडून गोळीबाराचा प्रयत्न, उमर थोडक्यात बचावला https://gl/JMk8A1
- गांधी विचारांच्या परीक्षेत कुख्यात डॉन अरुण गवळी पहिला, नागपूर सेंट्रल जेलच्या अंडासेलमध्ये परीक्षा, 80 गुणांच्या परीक्षेत गवळीला 74 गुण https://gl/4Qm2nB
- औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणी पंचनामे पूर्ण, 60 कोटींपेक्षा जास्त नुकसान, आतापर्यंत 37 जण अटकेत, धरपकड सुरुच https://gl/1FhmZc
- खंडणी न दिल्याने नवी मुंबईतील भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण, गुंडांना घेऊन धुमाकूळ, शत्रुघ्न काकडेचा पराक्रम सीसीटीव्हीत कैद https://gl/f1bmM5
- भारतात जगण्यासाठी सर्वोत्तम शहरांमध्ये महाराष्ट्राचा डंका, पुणे पहिल्या स्थानी, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा पहिल्या 10 शहरांमध्ये समावेश https://goo.gl/xg3S29
- माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन, मूत्रपिंडाच्या विकारानं 89 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास https://gl/icMmF1
- रेल्वे पोलिस भरतीत महिलांना 50% आरक्षण, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा, तर रेल्वे खात्यात आणखी 30 हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याचीही माहिती https://gl/Ctv17p
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























