एक्स्प्लोर

ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट : अखेर खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी

खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाने केली होती.खाजगी सुरक्षा रक्षकांचे होत असलेले हाल एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर आज खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगिन अगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हीच बाब समोर ठेवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी देखील आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. खाजगी सुरक्षा रक्षकांचे होत असलेले हाल एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर आज खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ज्यावेळी खाजगी सुरक्षा रक्षकांचे अडचणी मांडणारे पत्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आलं होतं. त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की, आम्ही मागील 7 महिन्यांपासून अनेक ठिकाणी दिवसरात्र सुरक्षा देण्याचं काम करत आहोत. यामध्ये मोठमोठ्या कंपन्या, रुग्णालये, महत्त्वाची ऑफिसेस, गाड्यांचे शोरूम यांचा समावेश आहे. टाळेबंदीच्या काळात ज्यावेळी मोठमोठया कंपन्या आणि ऑफिसेस बंद होती त्यावेळी आमच्या सुरक्षा रक्षकांनी याठिकाणी अहोरात्र सेवा केली आहे. त्याकाळात वाहतूक सेवा उपलब्ध नसताना देखील या कर्मचाऱ्यांनी आर्थिक जादा भुर्दंड सहन करत आपली सेवा निष्ठेने बजावली आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे की, ज्या पद्दतीने राज्य सरकारने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डाला लोकलने प्रवास करण्याची मुंबईत परवानगी दिली आहे.

खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवासाची परवानगी द्या, सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

त्याच पद्दतीने आम्हाला देखील मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी. कारण आमच्या सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य असणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेतील कर्मचारी हे मुंबई उपनगरातुन येत असतात. यातील बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना पगार 12 ते 13 हजार रुपये आहे. त्यांना महिन्याला मुंबई उपनगरातुन कामासाठी मुंबईत येण्यासाठी 3 हजार 500 ते 4 हजार रुपये इतका खर्च येत आहे. हा खर्च या सर्व कर्मचार्ऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.

याबाबत बोलताना सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरूचरणसिंह चौहान म्हणाले होते की, आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना आमच्या विविध मागण्यांबाबतचे पत्र दिलं आहे. यामध्ये प्रामुख्याने आमच्या खाजगी सुरक्षा रक्षकांना तत्काळ मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी ही मागणी केली आहे. सध्या मुंबईच्या उपनगरातुन मुंबईत विविध ठिकाणी आमचे कर्मचारी कामासाठी येत असतात. सध्या या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नसल्यामुळे त्यांना कमीतकमी 3 ते 4 तासांचा प्रवास करून मुंबईत यावं लागत आहे. तसेच त्यांना 2 ते 3 वेळा बस बदलावी लागत आहे. शिवाय तिकिटापोटी बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे या सर्व गरीब कर्मचाऱ्यांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हांला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. ही मागणी लक्षात घेत आता खाजगी सुरक्षा रक्षकांना आपले ओळखपत्र दाखवून लोकलने प्रवास करता येणार आहे.

सर्व कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत हालचाली; राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनामध्ये बैठक

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!

व्हिडीओ

Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Embed widget