एक्स्प्लोर
आराध्याला नवं जीवन! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबईतील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात काल सकाळी 9 वाजता या शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या शोधात असेलेल्या आराध्यामुळेवर अखेर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात काल सकाळी 9 वाजता या शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
आराध्याला एप्रिल 2016 ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त 10 टक्के काम करत होतं, असं आढळून आलं होतं. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता.
आराध्याला हवं असलेलं हृदय सुरतच्या एका रुग्णालयात मिळालं. आराध्याचे वडील योगेश मुळे गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या शोधात होते. यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मोहिमही राबवण्यात आली. अनेक दिग्गजांनी अवयवदानाबद्दल जनजागृती केली. अखेर आराध्याच्या आयुष्यात तो दिवस आला, ज्याची तिला दीड वर्षांपासून प्रतीक्षा होती.
सुरतहून हृदय मुंबईत आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला. सकाळी नऊ वाजता आराध्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली.
सूरतच्या एका ब्रेनडेड झालेल्या 14 महिन्यांच्या बाळाच्या अवयवदानानंतर आराध्याला हृदय मिळालं. या बाळाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अवयवदानाबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
या दिवसाची गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षा होती. हृदयासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आवाहन करण्यात आलं. मात्र आराध्याला हवं असलेलं हृदय मिळत नव्हतं. अखेर सुरतहून तो फोन आला, ज्याची दीड वर्षांपासून वाट पाहत होतो, अशी भावना योगेश मुळे यांनी माय मेडिकल मंत्र या वेबसाईटशी बोलताना व्यक्त केली.
संबंधित बातमी : 'दिल'दार भेटला! अखेर चिमुकल्या आराध्याला हृदय मिळालं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement