Mumbai News : गोरेगाव फिल्मसिटीत सात महिन्याचा बिबट्या मृत अवस्थेत; पोलिस वन विभागाचा तपास सुरु
Mumbai News : मुंबईतील गोरेगाव (Mumbai Goregaon) परिसरातील फिल्मसिटीमध्ये (Film City) बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Leopard News : मुंबईतील गोरेगाव (Mumbai Goregaon) परिसरातील फिल्मसिटीमध्ये (Film City) बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरे कॉलनीतील फिल्मसिटीच्या आतमध्ये असलेल्या देवी पाडा परिसरामध्ये काल संध्याकाळी 7 महिन्याचा बिबटा मृत अवस्थेत पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच बोरिवली वन विभागाचे (Forest Department) अधिकारी फिल्मसिटीमध्ये दाखल होऊन बिबट्याला पोस्टमार्टमसाठी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेले आहेत.
बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याची प्राथमिक माहिती गोळा केली असता, ज्या बिबट्याचा मृतदेह सापडला तो बराच काळ आजारी असल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.
दरम्यान, रविवारी सकाळी सेटवरील कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. फोन करताच आरे पोलिस आणि नॅशनल पार्कचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याचे शव राष्ट्रीय उद्यान वन्यजीव रुग्णालयात नेले. यानंतर मृत बिबट्याचे पोस्टमार्टम केले जाईल आणि त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
वन विभागाचा तपास सुरु :
मात्र, दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याच्या तस्करी करणारे काही लोकांनी ट्रॅप लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुन्हा ट्रॅपमध्ये फसून बिबट्याचा मृत्यू झाला आहे का या सर्व संदर्भात अधिक तपास बोरिवली वन विभाग करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
