एक्स्प्लोर
Advertisement
डॉ अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक
बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी, पोलिसांनी परळमध्ये राहणाऱ्या चौघांना अटक केली आहे.
मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुंबईतील 29 ऑगस्टच्या तुफानी पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाड्याजवळ सापडला होता.
याप्रकरणी दादर पोलिसांनी परळमध्ये राहणाऱ्या चौघांना अटक केली आहे. सिद्धेश भेलसेकर (25), राकेश कदम (38) त्याचा भाऊ निलेश आमि दिनार पवार (36) अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.
सूत्रांच्या मते, या चौघांनी मॅनहोलचं झाकण उघडलं होतं. पावसामुळे त्यांच्या घरात पाणी येत होतं, ते घालवण्यासाठी त्यांनी मॅनहोलचं झाकण हटवल्याचं सांगण्यात येत आहे.
“आम्ही परिसरातील अनेकांची चौकशी केली. या चौघांनी घरात पाणी घुसू नये म्हणून, सेनापती बापट मार्गावरील सुपर्श इमारतीजवळचं मॅनहोल उघडल्याचं समजलं. त्यांना झाकण उघडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. शिवाय त्यांनी कोणताही सूचना फलक लावला नव्हता, त्यामुळेच त्या चौघांचा निष्काळजीपणा समोर आला आहे” असं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, या चौघांना शनिवारी अटक करण्यात आली असून, त्यांना भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी दिली.
दोन दिवसांनी डॉक्टर अमरापूरकरांचा मृतदेह सापडला
बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटवकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह 31 ऑगस्टला वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला. मंगळवारी (29 ऑगस्ट) दुपारी 4.30 वाजल्यापासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते.
मुसळधार पावसामुळे 29 ऑगस्टला मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते.
लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. एलफिन्स्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत.
महापालिकेकडून चौकशी समिती
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी एक सदस्यीय समिती नेमली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मुंबई महापालिकेने आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याने हे मॅनहोल उघडं ठेवलं नसल्याचा दावा केला आहे.
डॉ. दीपक अमरापूरकर यांची ओळख
डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.
मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत.
संबंधित बातम्या
डॉ. अमरापूरकरांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका
बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला
पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळले?
बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला
डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी 2 आठवड्यात उत्तर द्या, हायकोर्टाचे निर्देश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement