एक्स्प्लोर

मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की

गोंधळामुळे थांबलेला परिसंवाद नंतर सुरु करण्यात आला. राजकीय परिघापासून दूर राहिलेल्या साहित्य संमेलनाला यामुळं वादाची किनार लागली आहे. यावेळी वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले.

उस्मानाबाद : 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलनाच्या व्यासपीठावर परिसंवादावेळी काहीकाळ चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. 'संत साहित्याचं आकलन न झाल्यामुळं बुवाबाजी वाढतेय का' हा परिसंवाद सुरु असताना व्यासपीठावर गोंधळ सुरु झाला. जगन्नाथ पाटील यांनी वक्त्याला थांबवून विषयाला आक्षेप घेत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस संमेलनस्थळी दाखल झाले. गोंधळामुळे थांबलेला परिसंवाद नंतर सुरु करण्यात आला. राजकीय परिघापासून दूर राहिलेल्या साहित्य संमेलनाला यामुळं वादाची किनार लागली आहे. यावेळी वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले. आमचा कार्यक्रमाला विरोध नव्हता तर विषयाला विरोध होता. आयोजकांनी बाउन्सर बोलून कार्यक्रमात गोंधळ वाढवला, असे गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांनी म्हटलं आहे. संतांच्या साहित्याच्या पुरेसं आकलन न झाल्याने बुवाबाजीचे प्रस्थ वाढले/वाढते असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. इतक्या मोठ्या मंचावर दोन्ही बाजूने चर्चा व्हायला हवी होती. आम्ही विषय मांडणीसाठी परवानगी मागितली होती. यामध्ये कोणत्या संघटना पक्षाचा समावेश नाही आम्ही, आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक आहोत, असेही आंदोलक गुरुप्रसाद हुंडेकर आणि श्रीकांत रांजणकर यांनी म्हटलं आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की हा परिसंवाद सुरु झाल्यानंतर जे सर्वात आधी मंचावर चढले ते जगन्नाथ पाटील हे शिक्षण संस्था चालक आहेत. जगन्नाथ पाटील यांच्यासोबत काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते देखील होते, अशी माहिती मिळाली आहे. जगन्नाथ पाटील हे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. त्यांनी मला कोणताही वाद घालायचा नाही. संमेलनाला माझा पाठिंबा आहे. काही इतर लोकांनी गोंधळ घातला असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. मी माझा वेगळा विषय मांडण्याची परवानगी घेण्यासाठी मंचावर गेलो होतो, असे पाटील म्हणाले. परिसंवाद सुरु झाल्यानंतर मी माझी भूमिका मांडण्याठी मंचावर गेलो. संत साहित्याच्या संदर्भात विषय होता. पैठणच्या संतपीठाला मान्यता मिळून 25 वर्ष झाली. मात्र अजून तिथं काही कार्यवाही झालेली नाही. त्या कार्यवाहीच्या संदर्भात मी एक पीआयएल कोर्टात दाखल केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी मी मंचावर गेलो होताे, असे जगन्नाथ पाटील म्हणाले. मात्र मी ही मागणी करायला गेल्यावर काही अन्य लोकं आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, असेही पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत   या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली. वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या एका  पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली. पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर देखील धक्काबुक्की करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित बातम्या  

 संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत  

Special Report | सीएए, जोएनयू प्रकरणावर फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचं परखड मत | ABP Majha

Sahitya Sammelan अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो याच्या तब्येतीत बिघाड | ABP Majha

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईत परतले

मराठी साहित्य संमेलन | एका हातात धर्मग्रंथ तर दुसऱ्या हातात संविधान हवं : फादर दिब्रिटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget