Sahitya Sammelan अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो याच्या तब्येतीत बिघाड | ABP Majha
प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो मुंबईला परतले आहेत. उस्मानाबादमध्ये 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासून त्यांना पाठीचा त्रास होत होता. अखेर त्यांना मुंबईत उपाचारासाठी होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आधीपासून हा त्रास सुरु होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक डॉक्टरांनी देखील त्यांच्यावर उपचार केले होते. पण त्यांच्या वसईतील त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष संमेलनाच्या पहिल्याचं दिवशी मुंबईत उपाचारासाठी दाखल झाले.






















