एक्स्प्लोर

Boisar MIDC Accident : बोईसरच्या भगेरिया केमिकल्समधील ओलियम गॅस गळतीवर नियंत्रण; NDRF दाखल, सुदैवाने जीवितहानी टळली

Boisar MIDC Accident Update: तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला लिकेजवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेनंतर तारापूर MIDC मधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Boisar Tarapur MIDC : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील भगेरिया केमिकल्स कंपनीत ओलियम वायूची गॅस गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सोमवारी दुपारी दोन ते सव्वादोनच्या सुमारास ओलियम साठवण टँकमधून गळती सुरू झाली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला लिकेजवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Industrial Gas Leak Incident : आगीनंतर गॅस गळती, कामगारांची पळापळ

एमआयडीसीतील भगरिया केमिकल्स कंपनीत आधी आगीची घटना घडली आणि त्यानंतर ओलियम वायूची गळती सुरू झाली. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फर डायऑक्साइड आणि इतर सल्फर ऑक्साइडची निर्मिती होऊन त्याचा परिणाम परिसरातील कामगार आणि नागरिकांवर झाला. अनेकांना डोळ्यांत जळजळ, घशात खवखव आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Oleum Gas Effect : 1 ते 1.5 किमी परिसर बाधित

प्राथमिक माहितीनुसार, गॅसचा परिणाम सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात जाणवला. ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्यावर सल्फर डायऑक्साइड तयार होत असल्याने डोळे लाल होणे, चुरचुरणे, घसा कोरडा पडणे असे लक्षणे दिसून आली. 

NDRF and Fire Brigade Action : चार तासांनंतर नियंत्रण

अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत गॅस लिकेजवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर टँकमधील गळतीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे एक टन ओलियम गळतीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Safety Measures Taken : शाळा बंद, कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले

टाकी नाका परिसरातील तारापूर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी सोडण्यात आले. तसेच आसपासच्या उद्योगांतील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

Repeated MIDC Incidents : यापूर्वीही अशाच घटना

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या शिवाजीनगर भागात सल्फ्युरिक अॅसिड आणि ओलियमची गळती होऊन परिसर बाधित झाला होता. त्यामुळे बोईसर तारापूर एमआयडीसीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget