एक्स्प्लोर
Advertisement
Quick Recipe: लहान मुलांसाठी स्नॅक्समध्ये बनवा पोटॅटो पनीर शॉट्स; कमीत कमी वेळात बनवा खुसखुशीत डिश
Potato Paneer Shots: लहान मुलांसाठी नाश्त्याला काय बनवायचे? असा प्रश्न नेहमीच पडतो. आज अशीच एक खमंग रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी मुलांना नक्कीच आवडेल.
Potato Paneer Shots Recipe: मुलांना स्नॅक्समध्ये अनेकदा कुरकुरीत, खुसखुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आवडतात. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या फ्रेंच फ्राईज (French Fries) आणि पोटॅटो नगेट्सला (Potato Nuggets) मुलं नेहमीच पसंती दर्शवतात. पण जर तुम्हाला तुमच्या मुलांना जंक फूड्सपासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही घरीच नाश्त्याला पोटॅटो पनीर शॉट्स (Potato Paneer Shots) तयार करू शकता. खुसखुशीत पनीर शॉट्स बनवणे देखील खूप सोपे आहे आणि मुलांनाही ते खूप आवडेल. आपण ते स्टार्टर म्हणून देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया पोटॅटो पनीर शॉट्स (Potato Paneer Shots) बनवण्याची रेसिपी-
साहित्य
- उकडलेले बटाटे - 2
- पनीर क्यूब - 1 कप
- हिरवी मिरची-आले-लसूण पेस्ट - अर्धा कप
- ओवा - अर्धा टीस्पून
- लाल तिखट - अर्धा टीस्पून
- चिरलेली कोथिंबीर - 2 ते 3 चमचे
- बेसन - 1 वाटी
- तेल - 1 कप
- चवीनुसार मीठ
कसे बनवायचे पोटॅटो पनीर शॉट्स?
- पोटॅटो पनीर शॉट्स बनवण्यासाठी बटाटे उकडून घ्या आणि नंतर मॅश करा.
- यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करा.
- नंतर पनीरचे छोटे तुकडे करा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन घालून त्यात लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
- आता बेसनाच्या पिठात थोडं थोडं पाणी टाकून भजांना लागणाऱ्या मिश्रणाप्रमाणे घट्ट मिश्रण तयार करा.
- आता एका कढईत 1 टीस्पून तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.
- तेल गरम झाल्यावर त्यात ओवा आणि हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून मिक्स करावे.
- काही वेळानंतर चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
- आता बटाटे पॅनमधून काढून थंड होऊ द्या.
- आता बटाट्याचे छोटे गोळे बनवा.
- आता तयार केलेल्या गोळ्याच्या मध्ये पनीरचा तुकडा ठेवा आणि गोळा पुन्हा बंद करा.
- असेच करून सर्व गोळे तयार करा
- गोळे तयार झाल्यावर कढईत तेल गरम करा.
- तेल व्यवस्थित गरम झाल्यावर ते गोळे बेसनाच्या पिठात बुडवा आणि मग तेलात तळून घ्या.
- सर्व बाजूंनी गोळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
खमंग पोटॅटो पनीर शॉट्स तयार आहेत, आता ते सॉस बरोबर सर्व्ह करा.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement