एक्स्प्लोर

'अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी...!' मुख्यमंत्री ठाकरेंची कोटी अन् हशा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवासाठी शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा उत्साह पाहायला मिळाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकीय कोट्या देखील केल्याचं समोर आलं. यात विशेष चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोळ्याच्या भाषेची.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. जयंती उत्सवासाठी शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा उत्साह पाहायला मिळाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकीय कोट्या देखील केल्याचं समोर आलं. यात विशेष चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोळ्याच्या भाषेची.

त्याचं झालं असं की, आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात अजित दादांचं कौतुक करताना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची सांकेतिक खूण मावळ्यांना योग्य सूचित करायचे. आत्ता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. बेनकेंनी असं म्हणताच अजित दादांनी हात जोडले.

मात्र बेनकेंच्या या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलीच फिरकी घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार अतुल बेनके म्हणाले दादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या जयंती राज्यात उत्साह, पण 'हे' नियम मात्र पाळावे लागणार

कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं, असं ते म्हणाले.

Shiv Jayanti 2021 : कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे

रायगडावर केलेली लायटिंग उत्साही लोकांचा अजाणतेपणा- अजित पवार यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवजयंती जोमाने साजरी करावी यात दुमत नाही. पण सध्या कोरोना पुन्हा कहर माजवू लागलाय. मंत्र्यांना ही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे शिवजयंती सारखे उत्सव नाईलाजाने थोडक्यात घ्यावे लागतायेत. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता, असं अजित पवार म्हणाले. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.

ते म्हणाले की, गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती. तो 23 कोटी 50 लाखांचा निधी आज पोहोचलेला आहे. आता या निधीतून दर्जेदार काम व्हायला हवं. हे निधी गडाच्या संवर्धनासाठी आहे, याच भान सर्वांनी ठेवायला हवं. यात वेळ न दवडता करता वेळेतच विकासकाम पूर्ण व्हायला हवं अशी तंबी देखील अजित पवारांनी दिली.

कोरोना स्थितीसंदर्भात रविवारी महत्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळं काल काही जिल्ह्याबाबत आम्ही निर्णय घेतले. आरोग्य मंत्री राजेश टोपे, जयंत पाटील अशा अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना फोफावत असताना नागरिक निष्काळजीपणा दाखवत आहेत, त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. याची कल्पना ठेवायला हवी. ते म्हणाले की, पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णाबाबत रविवारी बैठक. आज हा कार्यक्रम असल्याने मी रविवारी बैठक घेतली आहे. मास्क बाबत कडक कारवाई करायला हवी. रायगडावर केलेली लायटिंग केली, हा उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलीABP Majha Headlines : 10 AM : 04 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 3 July 2024 : ABP MAJHATeam India in India : टीम इंडिया ITC मौर्यामध्ये दाखल, हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Embed widget