एक्स्प्लोर

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या जयंती राज्यात उत्साह, पण 'हे' नियम मात्र पाळावे लागणार

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे.जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी मार्गदर्शक सूचना

1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

6. Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget