एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | मालेगावात अचानक कोरोना बाधितांचा आकडा कसा वाढला? एका दिवसात 18 रुग्ण

मालेगावात अवघ्या 12 तासांत 18 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव आता कोरोना हॉटस्पॉट झालय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक जिल्ह्यातील 27 कोरोना रुग्णांपैकी एकट्या मालेगावात 26 रुग्ण संख्या आहे.

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे आता हॉटस्पॉट झालय का? असा सवाल आता उपस्थित होतोय. ह्याला कारण ठरलय ते म्हणजे कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या. मालेगावमध्ये एका दिवसात 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत मालेगावात तब्बल 28 जण हे कोरोना बाधित आहेत. या सर्व परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन चांगलंच कामाला लागलंय. यंत्रमाग आणि दाटीवाटीचे शहर अशी ओळख असणारे मालेगाव सध्या कोरोनामुळेच चांगलेच चर्चेत आलंय. मालेगाव कोरोनाच्या विळख्यात सापडलंय. पण, अचानक इथं कोरोनांची संख्या कशी वाढली? असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 27 रुग्ण हे मालेगावचे आहेत. यासोबतच दोन जणांचा मृत्यूही झालाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 12 तासात ईथे 18 नवे रुग्ण आढळल्याने मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातील हॉटस्पॉट बनलय का? असा सवाल आता उपस्थित होतोय. सहा एप्रिलला सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सोबतच आणखी चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. एकाच वेळी पाच रुग्ण सापडताच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव गाठत कृषी मंत्री आणि यंत्रणेसोबत बैठक घेत सर्व आढावा घेतला होता.

Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण

मालेगाव शहरात यंत्रमागावर काम करणारे लोक असून अत्यंत दाटीवाटीच्या घरांमध्ये ते राहत असल्याने तेथे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही, तर यंत्रमागाच्या तयार होणा-या कापडाचे बारीक कण हे नाकावाटे, तोडा वाटे कामगार तसेच नागरीकांच्या तोंडात जात असल्याने दम्यांचे आजार होतात. कदाचित त्यामुळे कोरोना बाधितांना त्याचा अधिक संसर्ग वाढत असल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली मालेगावात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून 12 एप्रिलला हा आकडा 28 वर जाऊन पोहोचलाय तर मालेगावातील मृत्यूची एकूण संख्याही दोनवर गेली आहे. एका महिलेचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही सर्व परिस्थिती बघता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या मोमीनपुरा, कमलपुरा, नयनपुरा या परिसरात निर्जंतुकीकरण केलं जातय. घरा घरात जाऊन आरोग्य यंत्रणेकडून तपासणी केली जात असून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचाही शोध घेतला जातोय. पोलिसांनी मंगळवारी रात्री 12 पर्यंत कर्फ्यूचे आदेश दिले असून संपूर्ण मालेगावात दोन एसआरपीच्या तुकड्यांसोबतच चोख पोलिस बंदोबस्त ईथे तैनात करण्यात आलाय. अत्यावश्यक सेवाही सकाळी 7 ते 12 या वेळेतच सुरु आहे. कोरोनाचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी मालेगावात आता इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचीही निर्मिती केली गेली आहे.

Nagpur | नागपूरमध्ये रस्त्यावर जागोजागी थुंकणारा पोलिसांच्या ताब्यात, तपासणीसाठी तरूण जीएमसी रुग्णालयात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Mahayuti CM: राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Embed widget