एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजारच्या आसपास पोहचला आहे. आज मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तर, पुण्यात आज दोन बळी गेले.

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दोन हजारच्या जवळ गेला आहे. यात मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात आज नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, पुण्यात आज दोन बळी गेलेत. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक नर्सला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या संपर्कातील 25 नर्सेसला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून आताच्या घडीला राज्यात एक हजार 895 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने राज्याचे संपूर्ण लक्ष या शहरात लागले आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच

रॅपिड टेस्टिंगला विलंब? केंद्रातून परवानगी मिळूनही राज्यात रॅपिड टेस्टिंगची अमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड - 19 साठीच्या चाचण्या आणखी वेगाने होणं गरजेचं आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन आठवड्यांपूर्वी घोषणा करूनही अद्याप रॅपिड टेस्टिंगला राज्यात हिरवा कंदील मिळालेला नाही. स्वॅब टेस्टिंगच्या तुलनेत रॅपिड टेस्टिंग चाचण्या 100 टक्के अचूक निकाल देतील याची शाश्वती नसल्याचं अधिकाऱ्यांमधील एका गटाचं मत आहे. त्यामुळे रॅपिड टेस्टिंगमध्ये जर कोविड - 19 चे पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आले तर या संकटात भर पडू शकते, अशी काहींना भीती आहे. कोविड - 19 च्या निदानासाठी रॅपिड टेस्टिंग प्रमाण मानलं जात नसलं तरी सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ही पद्धत प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. रॅपिड टेस्टिंग आणि स्वॅब टेस्टिंगमधला मूळ फरक आहे तो निकालाच्या वेळेचा. पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास 24 तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रिझल्ट कळू शकतो.

Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे? World Corona Update

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget