एक्स्प्लोर
विश्वजित कदमांच्या कारला पुण्यात मोठा अपघात
मुंबईमधील बैठक आटोपून आमदार विश्वजित कदम पुण्यात येत असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातून कदम थोडक्यात वाचले आहेत.

पुणे : काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला काल (6 नोव्हेंबर)रात्री पुण्यात मोठा अपघात झाला. या अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले आहेत.
मुंबईहून पुण्यात येताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. कारमधील एअर बॅगमुळे विश्वजित कदम थोडक्यात वाचले. मात्र, अपघात इतका मोठा होता की त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विश्वजित कदम सुरक्षित असून ते नंतर कऱ्हाडच्या निघाले आहेत. कऱ्हाड या ठिकाणी आज मोठा कार्यक्रम असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत























