एक्स्प्लोर

Nautapa 2024 : नवतपा ठरला तापदायक! पहिल्या दोन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद, अनेक ठिकाणी पारा 45 - 46 अंशांच्या घरात

सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्याच दोन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 - 46 अंशांच्या घरात पोहचलय.

Vidarbha Weather Update नागपूर : सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला (Nautapa 2024) सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्याच दोन दिवसात विदर्भात (Vidarbha) विक्रमी तापमानाची नोंद (Temperature) झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. 

पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी कठीण 

विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) विश्रांती घेतल्यानंतर काल दुपार नंतर पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने (Temperature) हैराण झालेला नागरिकांना दुपारनंतर मात्र अवकळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या दमदार पावसाने यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नागपूरसह इतरत्र एकच दाणादाण उडवली. यात अनेक अपघात झाल्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्या आहे.

उकाड्यापासून लोकांचे हालेहाल

दुसरीकडे शनिवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भातील नागरिकांना चांगलेच होरपळले आहे. पहिल्या दिवशी विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून पारा 45 आणि 46 अंशांच्या घरात पोहोचला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यापासून लोकांचे हालेहाल झाल्याचे बघायला मिळाले आहे. पुढील काही दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सोबतच विदर्भात तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढणार असल्याचा इशाराही दिला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी तापमामाची नोंद 

यवतमाळ जिल्ह्यात आज 46 अंश सेल्सिअस अशी विक्रमी तापमामाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले असून गेल्या पाच वर्षांतले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर काल दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. या वादळामुळे अनेक घरावरील तीन पत्र उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

वादळी वाऱ्यामुळे 25 घरांची पडझड

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा बसला. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असल्याने काही रस्ते  देखील काही काळ बंद झाले होते. एकुणात अवकाळी पावसाने आज जिल्ह्यात एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Embed widget