एक्स्प्लोर
Advertisement
...तर मी साताऱ्याची पोटनिवडणूक लढवणार नाही : उदयनराजे भोसले
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याचवेळी उदयनराजे यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उदयनराजे यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची निवडणूक होणार आहे.
उदयनराजे भाजपच्या तिकीटावर साताऱ्याची जागा लढवणार आहेत. तर उदयनराजेंविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या तिकीटावर साताऱ्याची पोटनिवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील साताऱ्याची जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांच्या पोटनिवडणूक लढवण्याबाबत उदयनराजेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, शरद पवार जर निवडणुकीला उभे राहिले तर मी उमेदवारी अर्ज भरणारच नाही. फक्त त्यांनी (शरद पवारांनी) एकच गोष्ट करावी. दिल्लीतला बंगला आणि गाडीची मला मुभा द्यावी.
उदयनराजे म्हणाले की, शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी बोंबलत फिरायला मोकळा. त्यांनी निवडणुकीला उभं राहावं आणि मला आजमावून बघावं. त्यांनी मला सांगावं, मी नाही ऐकलं तर मला बोला, असे आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केले.
शरद पवारांबद्दल बोलताना उदयनराजे हळवे झाले. उदयनराजे म्हणाले की, शरद पवार माझ्यासाठी काल आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. माझ्या डॅडींनंतर (वडिलांनंतर) मला सर्वात जास्त प्रेम पवार साहेबांनी दिलं आहे. हे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले होते. एरवी डॅशिंग असणारे, 'स्टाईल इज स्टाईल' म्हणणारे, डायलॉगबाजी करणारे उदयनराजे आज चक्क माध्यमांसमोर रडत होते.
व्हिडीओ पाहा
शरद पवारांचा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना टोला | सातारा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
मुंबई
मुंबई
धाराशिव
Advertisement