एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2020 | मंगळवार
- भारतात कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीचा शिरकाव, ब्रिटनहून परतलेल्या सहा भारतीयांमध्ये नवीन जिनोम आढळला https://bit.ly/3hqkTSd इंग्लंडहून पुण्यात आलेले 109 प्रवाशांचा ठावठिकाणा सापडेना, पुणे महापालिकेची पोलिसांकडे धाव https://bit.ly/3rEODPZ
- सर्व्हर जाम झाल्याने भावी सरपंचांची धावपळ, जातपडताळणीसह ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यास मुदतवाढ, आता ऑफलाईन अर्जही स्वीकारले जाणार https://bit.ly/3huEMHR
- मुंबईत 26 जानेवारीपूर्वी शाळा सुरु होण्याची शक्यता, शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे सादर https://bit.ly/2WTZWpu
- मराठा-ओबीसींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा संघटनांची मागणी https://bit.ly/2WSICkB
- व्यभिचारी असल्याचा आरोप करत बलात्कार पीडितेला गावबंदी, बीडमधील तीन गावांचा संतापजनक ठराव, जिल्हा परिषदेकडून ठरावाची तपासणी https://bit.ly/3rM97Xk
- सुपरस्टार रजनीकांत याचा राजकारणाला दुरुनच रामराम, देवाचा इशारा समजत राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय मागे, तब्येतीकडे लक्ष देणार, चाहत्यांकडून स्वागत https://bit.ly/3pvfrAr
- कर्नाटक विधानपरिषद उपसभापतींचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला, सुसाईड नोटमध्ये 15 डिसेंबरला काँग्रेस आमदारांनी केलेल्या मानहानीचा उल्लेख https://bit.ly/3rDnLA4
- टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच अर्णब गोस्वामींचा उल्लेख, पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे तपशील https://bit.ly/2L2PuJw
- आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा 6 मार्चला, कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरुपात करण्याचा आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा निर्णय https://bit.ly/34RrX5u
- बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी https://bit.ly/2L2PwkC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
बातम्या
फॅक्ट चेक
Advertisement