Stock Market Opening : कशी आहे आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटची स्थिती? जाणून घ्या नफा होणार की तोटा?
प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 550 हून अधिक अंकांची उसळी दाखवत असला तरी, निफ्टीमध्ये जवळपास 150 अंकांची घसरण पाहायला मिळत होती.
Stock Market Opening: मुंबई : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटची (Stock Market ) सुरूवात संमिश्र स्वरूपात झाली. मार्केट सुरू होताच सेनेक्स (sensex)153.71 अंक आणि 0.27 टक्कांनी घसरून 57.542.75 वर सुरू होता. तर निफ्टीची (nifty) सुरूवात 17200 च्या वरून झाली. दरम्यान, प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 550 हून अधिक अंकांची उसळी दाखवत असला तरी, निफ्टीमध्ये जवळपास 150 अंकांची घसरण पाहायला मिळत होती.
प्री-ओपनिंगमध्ये मार्केटची हालचाल कशी होती?
आज मार्केट उघडल्यानंतर प्री-ओपनिंग मार्केटमधील व्यवहारांची स्थिती बदलती राहिली. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 581.25 अंक आणि 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 58,277.71 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 141 अंकांच्या आणि 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 17072 वर व्यवहार करत होता. त्यामुळे आज मार्केटची सुरुवात संमिश्र राहणार, असे संकेत मिळाले.
सुरुवातीच्या टप्यात कसे होते मार्केट?
मार्केटच्या पहिल्या 15 मिनिटांत, सेन्सेक्स 71.64 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 57,624 वर आणि निफ्टी 20.60 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 17176.10 वर व्यवहार करत आहे. निफ्टीचा निर्देशांक पाहिला तर बँक निफ्टीमध्ये घसरण दिसून येत आहे आणि तो 161.50 अंकांसह 0.45 टक्क्यांनी घसरून 36,035 वर व्यवहार करत आहे. निफ्टी फिफ्टीमध्ये थोडी वाढ होऊन तो 8400 च्या वर व्यवहार करत आहे.
नफा/तोटा पाहा
निफ्टीच्या 50 शेअर्समधील सर्वात जास्त चढणारा आलेख पाहिला तर, टेक महिंद्रा, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एचडीएफसी, हिंदाल्को आणि अल्ट्राट्रेक सिमेंट 1.11 टक्क्यांवरून 0.51 टक्क्यांनी वाढत आहेत. याशिवाय सर्वात जास्त घसरणारे शेअर्स पाहिले तर मारूतीमध्ये 1.61 टक्के घसरण आहे. शिवाय इंडसंइंडक बँक. आयशर मोटर्स आणि आयओसीसह एएनजीमध्येही घसरण पाहायला मिळत आहे.
आशियाई आणि अमेरिकन मार्केट पहा
आशियाई मार्केट पाहिले असाता, त्यामध्ये वाढ दिसून आली. तर SGX निफ्टीमध्ये सतत अस्थिरता पाहायला मिळाली. आशियाई मार्केटमध्ये हँग सेंग 1.16 टक्क्यांनी तर शांघाय निर्देशांक 0.46 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. याशिवाय शुक्रवारी अमेरिकन मार्केटेटचे तीनही निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हासह बंद झाले.
संबंधित बातम्या