एक्स्प्लोर
शेगाव स्थानकावर तीन महिलांना सुपरफास्ट ट्रेनने चिरडलं
शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई ते जोधपूर या सुपरफास्ट ट्रेनने या महिलांना चिरडलं. मृतांमध्ये सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय 30), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) छंदाबाई तिसरे (वय 45) यांचा समावेश आहे.

बुलडाणा : शेगावला दर्शनाला आलेल्या तीन महिलांचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली. शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई ते जोधपूर या सुपरफास्ट ट्रेनने या महिलांना चिरडलं. मृतांमध्ये सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय 30), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) छंदाबाई तिसरे (वय 45) यांचा समावेश आहे. या महिला अधिकमास आणि एकादशीनिमित्त दर्शनाला शेगावला आल्या होत्या. शेगाव रेल्वे स्थासनकावर नरखेड-भुसावळ पॅसेंजरमध्ये बसण्यासाठी त्या रेल्वे पादचारी पूल वापरण्याऐवजी रेल्वे रुळ ओलाडूंन जात होत्या. याचवेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनने त्यांना जोराची धडक दिली. एसटी संपामुळे जिल्ह्यातील सगळा भार रेल्वे सेवेवर आहे. नरखेड-भुसावळ पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या महिलांनी घाई केली आणि त्यांना यामध्ये समोरुन येणारी ट्रेन चुकवता आली नाही.
आणखी वाचा























