एक्स्प्लोर
पवार-ठाकरेंच्या सल्ल्यानेच सरसकट कर्जमाफी नाही: देशमुख
संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे, पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे, पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सक्षमीकरण कार्यशाळा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी ज्यांनी सहकार बुडवला त्यांनी आमच्यावर सहकार बुडत असल्याचा आरोप करु नये, अशी टीका विरोधकांवर केली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement





















