एक्स्प्लोर
भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न
भाजप आमदार उदयसिंग पाडवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे आमदार आहेत. त्यातच सावत्र बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

नंदुरबार : भाजप आमदार उदयसिंग पाडवी यांच्या जाचाला कंटाळून त्यांची सावत्र बहीण राधा पाडवी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. उदयसिंग पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स आमदार पाडवी यांनी बळकावल्याचा आरोप राधा पाडवी यांचा आहे. उदरनिर्वाहासाठी इतर कोणतेही साधन नसल्याने राधा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. राधा यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भाजप आमदार उदयसिंग पाडवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे आमदार आहेत. त्यातच सावत्र बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
आमच्याकडे कोणत्याही प्रकारे उदरनिर्वाहाचे साधन नाही. आमदारांनी त्यांच्या पदाचा वापर करत वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स हे आपल्याकडे ठेवत कोणत्याही प्रकारे हिस्से वाटणी न करता वापर करत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप राधा पाडवी यांनी केलाय.
“हिस्से वाटणीसंदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून दाद मागत आहोत. तशा तक्रारीही आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तर सादर केल्या आहेत. तरीदेखील त्यावर ती अद्याप कोणताही निर्णय झाला नाही व निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.”, असा आरोप राधा यांच्या सख्ख्या भावाने केलाय.
राधा पाडवी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर तळोदा पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप आमदार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. आता भाजप या संपूर्ण प्रकरणाची दखल घेईल का, हाच एक मोठा प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
