एक्स्प्लोर

Nashik Crime: बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा

Nashik Crime: विसे मळा गोळीबारप्रकरणी नाशिकरोड कारागृहात असलेल्या बागुल टोळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

Nashik Crime: विसे मळा गोळीबारप्रकरणी नाशिकरोड कारागृहात (Nashik Road Jail) असलेल्या बागुल टोळीचे अजून एक प्रकरण समोर आले आहे. जमीन व्यवहारात प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी, तसेच जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी संजय राठी, महेश राठी, अजय बागुल (Ajay Bagul), मामा राजवाडे (Mama Rajwade), बाळासाहेब ऊर्फ भगवंत पाठकसह 20 जणांविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आतापर्यंत रेकॉर्डवर न आलेला बाळासाहेब पाठक हा प्रकाशात आला आहे. या प्रकरणामुळे बागुल टोळीच्या अडचणी वाढणार आहेत.

मूर्तिकार चंदन गोटीराम भोईर (वय 40, रा. सरस्वतीनगर, रासबिहारी इंग्लिश मेडियम स्कूलरोड, के. के. वाघ अॅग्रिकल्चर कॉलेजशेजारी, कालिकामाता यज्ञ मंदिराजवळ, धात्रक फाट, 1 पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजय राजाभाऊ राठी, महेश संजय राठी (रा. गंगापूर रोड), मामा राजवाडे, अजय बागूल, मीना लोळगे, प्रतिक लोळगे, प्रतिक लोळगेचा भाऊ, बाळासाहेब पाठक व इतर 10 ते 12 अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात खंडणी, मारहाण, कब्जा करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Nashik Crime: प्लॉटचा कब्जा

चंदन भोईर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी साथीदारांसमवेत घराच्या कम्पाउंडमध्ये लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेवून जबरदस्ती प्रवेश केला. प्लॉटचे तार कम्पाउंड व पत्राचे शेड व मालकी हक्काचा बोर्ड तोडून त्या ठिकाणी जबदरदस्तीने वॉल कम्पाउंड करत भोईर कुटूंबाला जिवे ठार मरण्याची धमकी देत शिवीगाळ व धक्काबुक्की करून प्लॉटचा कब्जा घेतला. तसेच संजय राठी व प्रतिक लोळगे याने चंदन भोईर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला परंतू वार चुकला व कुटुंबीयानी धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचवला. 

Nashik Crime: 57 लाख रूपयांची खंडणी उकळली 

संजय राठी, महेश राठी तसेच आरोपीनी संगनमत करून अवाजवी 57 लाख रूपयांची खंडणी घेतली. तसेच फिर्यादीला व कुटूंबाला संजय राठी, महेश राठी, अजय बागुल, मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक व त्यांचे इतर गुंड साथीदारांची भीती दाखवून जबरदस्तीने इच्छेविरूध्द सुलेनामा करून घेतला. त्यानंतर अजय बागुल, मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक यांनी फिर्यादीला फिर्यादीचे जागेवरील कब्जा सोडून ती जागा फिर्यादीला परत मिळवून देण्यासाठी 2 कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्यास फिर्यादीला व कुटूंबाला संपवून टाकण्याची व जमीनीचा कब्जा कायम स्वरूपी स्वतः कडे ठेवण्याची धमकी दिली. वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उमेश बोरसे तपास करत आहेत.

Nashik Crime: जागेचा ताबा सोडण्यासाठी तब्बल दोन कोटींची खंडणी मागितली

भोईर परिवार मूर्तिकार असून, भगवान शंकर तसेच कालिमाता पूजक आहे. शहरातील अनेक लोकांच्या वैयक्तिक अडचणी सोडवणाऱ्या या परिवाराच्या जमिनीवर राठी यांची नजर पडली व त्यानंतर त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू झाला. 16 मार्च ते ऑगस्ट 2025 दरम्यान हे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली वावरत होते. पैसे जमवून 57 लाखांची खंडणी दिल्यानंतर जागेचा ताबा मिळवण्यासाठी दोन कोटींची मागणी झाल्याने ते हतबल झाले होते. तेव्हा म्हसरूळ पोलिसांकडेही धाव घेतली होती. परंतु दिवाणी प्रकरण असल्याचे सांगून त्यांना परत पाठवून देण्यात आले होते. गोळीबार, पंजाब बारप्रकरणी यातील आरोपींना अटक होऊन कठोर कारवाई झाल्याने भोईर परिवाराला धीर आला व त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget