एक्स्प्लोर
Navneet Rana on Raj Uddhav Thackeray : 'दोन्ही भाऊ फक्त दुकानदारी आणि तोड्यांसाठी एकत्र'
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली आहे. 'आज उद्धव ठाकरे जींची जी परिस्थिती झाली आहे, बाळासाहेब ठाकरे जी वरूनही पाहत असतील की माझ्या एका ललकारवर पूर्ण महाराष्ट्र मला फॉलो करायचा, पण आज माझ्या मुलाने मतांसाठी रस्त्यावर फिरायची परिस्थिती आणली आहे,' अशा शब्दात राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दोन्ही भाऊ केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी आणि दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र येत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाचे किती आमदार आणि नगरसेवक आहेत हे सांगावं, असं आव्हानही राणांनी दिलं आहे. ज्यांना स्वतःच्या पराभवानंतरही निवडणूक आयोगावर विश्वास आहे, त्यांच्या उलट ठाकरे बंधू आता ईव्हीएमवर शंका घेत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















