एक्स्प्लोर

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?

Sikandar Shaikh Arrested: सिकंदर शेख शस्त्र तस्करीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिकंदर मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

Sikandar Shaikh Arrested: पंजाबमधील मोहाली पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह (Sikandar Shaikh) चार जणांना अटक करून आंतरराज्य शस्त्र पुरवठा साखळीचा (interstate arms supply network) पर्दाफाश केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी निगडीत आहेत. अवैध शस्त्रे पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्यासाठी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून मिळवण्यात आली होती. सिकंदर कथितरित्या स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता. त्याला यूपीच्या दानवीर आणि बंटीसोबत एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथं व्यवहारादरम्यान अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण पाच पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली.

आंतरराज्यीय शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी खेळाडूचा वापर 

पोलिसांना संशय आहे की या नेटवर्कचे पंजाबमार्गे पैसा पाठवणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांशी (multiple state-based gangs) संबंध होते. सिकंदर शेख (वय 26) हा राष्ट्रीय स्तरावरील पैलवान असून तो मुळचा सोलापूरमधील आहे. अन्य आरोपींमध्ये दानवीर हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. तो पापला गुज्जर टोळीचा मुख्य सूत्रधार (key operative) आहे. दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून (murder), दरोडा (dacoity) आणि आर्म्स ॲक्टचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बंटी (वय 26) हा देखील उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. कृष्ण कुमार उर्फ ​​हॅपी गुज्जर (वय 22) हा एसएएस नगरमधील नड्डा गावचा आहे. सिकंदरच्या अटकेमुळे गुन्हेगारीशी संबंध असलेले खेळाडू आंतरराज्य शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी चेहरा म्हणून वापरले जात असल्याचे समोर आलं आहे. या टोळीची साखळी शोधण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकले जात आहेत आणि पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) हरमनदीप सिंग हंस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! 

दरम्यान, सिकंदर शेख शस्त्र तस्करीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिकंदर मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरात कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे. कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यामुळे त्याचं नाव महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचलं. त्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला. मात्र, नोकरी सोडून दिली होती. सिकंदर हा पदवीधर असून गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये शस्त्र पुरवठा साखळीत तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्यामुळे अत्यंत गरीब घराण्यातून पुढे आलेल्या सिकंदरच्या कारनाम्यामुळे आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा डागाळली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget