एक्स्प्लोर

Jemimah Rodrigues IND vs AUS : बुद्धिमान जेमीमा...

'Fortune favors the brave', असे नेहमी का म्हटले जाते ते काल उपांत्य सामन्यात दिसून आले...नशीब शूर माणसाला नेहमी साथ देते.... काल तर भाग्याचा रंग देखील निळा होता.....आणि त्याने जिला साथ दिली ती शूरवीर होती बुद्धिमान जेमीमा......

तिला या स्पर्धेत एकदा वगळले होते....पण ती निराश नव्हती. ..ती काय दर्जाची खेळाडू आहे हे तिने पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाविरुद्ध दाखवून दिले....आणि काल ती तिच्या हरमन दीदी सोबत स्वप्नाचा पाठलाग करताना चालत गेली....

काल हर्मन चौफेर होती.. कलात्मक होती तर 

जेमीमा बुद्धिमान होती...काल तिच्यामध्ये प्रचंड गेम अवेअरनेस होता....तिला माहीत आहे की षटकार मारणे हे तिचे काम नाही.. ..आणि ती त्या मोहात पडली नाही. ..तिच्या आवडत्या स्वीप या फटका तिने फार खेळला नाही ....जेव्हा तिने तो प्रयत्न केला तेव्हा ती बाद होता होता वाचली...तिने काल धावा वसूल केल्या त्या शॉर्ट थर्ड आणि बॅकवर्ड पॉईंट मधून....ती शेवटपर्यंत एकेरी दुहेरी धावा धावली....मोक्याचा क्षणी तिच्या स्कूप आणि रिव्हर्स स्वीप वर चौकार मिळाले.....पण या सर्व धावपळीत ती "स्थितप्रज्ञ" राहिली, अविचल राहिली. . तिची दीदी बाद झाली तरी ती शांत होती....कारण हा सामना आपण जिंकू शकतो यावर तिचा विश्वास होता....अगदी तिला 35 चेंडूत चौकार मिळाला नव्हता तरीसुद्धा.....शेवटी अमनजीत ने मारलेल्या चौकाराने आपण अंतिम फेरीत गेलो आणि जेमीमा च्या शतकाला विजयाचे कुंकू लागले....ती स्वीप खेळतं असताना एकदा पायचीत होताना तर एकदा झेलबाद होताना ....एकदा कव्हर मध्ये झेलबाद होताना....तर एकदा धावचीत होताना वाचली......पण काल भाग्याचे दुसरे नाव "जेमीमा" होते...

शेफाली आणि स्मृती बाद झाल्यावर प्रचंड दबावाखाली हर्मन मैदानात उतरली..... खेळाडू म्हणून पाचवा तर कर्णधार म्हणून पहिला विश्वचषक खेळताना आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे याची जाणीव हर्मन हिला होती....तिने थोडा वेळ घेतला ....पण एकदा स्थिर झाल्यावर तिने तिचा आवडीचा स्क्वेअर ड्राईव्ह बाहेर काढला....आणि अर्धशतकानंतर "उंच उंच लढवू" या थाटात षटकार मारले....आणि जेमीमा सोबत 167 धावांची भागीदारी केली.... तिने मारलेले काही पुलचे फटके जे मिडविकेट सीमारेषे बाहेर गेले ते पॉंटिंगची  आठवण देऊन गेले इतके ते सराईतपणे मारले होते.... तिच्या चेंडूवर बाद झाली तो खरे तर सीमारेषा बाहेर जायला हवा होता पण काल तिला मात्र भाग्याची साथ मिळाली नाही...,. आणि ऑस्ट्रेलियाची अव्वल खेळाडू गार्डनर हिने 19 मीटर धावत येऊन सुर मारत तो झेल पकडला...

हरमन बाद झाल्यावर पुन्हा एकदा जेमीमा ने दीप्ती आणि रिचा सोबत छोट्या भागीदारी केली आणि करोडो भारतीयांच्या आशा दोन तारखेला जिवंत ठेवल्या.....
प्रथम फलंदाजी करताना पेरी आणि 18 वर्षीय अत्यंत गुणवान "लीचफील्ड" यांच्या जोरावर 338 धावा केल्या त्यात भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा वाटा मोठा होता....
कुठल्याही उपांत्य सामन्यात 338 हवा खरे तर पुरेशा ठरायला हव्या होत्या....

पण कालचा दिवस  जसा जेमीमा हिचा होता ....तसाच तो शापित अमोल मुजुमदार यांचा देखील होता..... आपल्या उमेदीच्या काळात स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारे अमोल मुजुमदार यांना भारतीय संघाची कॅप मिळालेली नाही.... त्याचे शल्य त्यांना असेलच..... पण भारतीय मुलींकडून हा विश्वचषक जिंकून त्या शल्ल्यावर मात करण्याचा त्यांचा निर्धार नक्कीच असेल...

काल त्यांच्या या स्वप्नाला पाठबळ दिले ते हर्मन आणि जेमीमा या दोन फुलांनी.... काल ही फुले फक्त फुलली नाहीत तर आपल्या फटाक्यांनी पूर्ण मैदानावर त्यांनी सडा पाडला...... 19 नोव्हेंबर 2023 मध्ये  झालेली भारतीय क्रीडा रसिकांच्या हृदयावर जखम अजून ही ताजी आहे.... त्याच्यावर आज महिला संघाने फुंकर मारली आहे.... येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्याच्यावर त्यांच्याकडूनच मलमपट्टी देखील केली जाईल....

आज भारतीय संघातील हर्मन आणि जेमीमा या दोन फुलांसाठी  कवयत्री 'संजीवनी'

यांच्या दोन ओळी आठवतात...

"फूल थांबते का फुलायाचे बोभाट्यास घाबरून
उजळते अंधारात ओळ सुगंधाची पांघरून..."

संजीवनी....

कालचा विजयाचा हा सुगंध झोपलेल्या भारतीय प्रसार माध्यमांना सुद्धा जागा करेल...
वेल डन टीम इंडिया...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway:  नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Embed widget