एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज, 'या' उपाययोजना करण्याचे आदेश
प्रत्येक बस सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ करावी, वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना सॅनिटरी लिक्विडची एक बाटली देण्यात यावी, असे आदेश एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
![Coronavirus | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज, 'या' उपाययोजना करण्याचे आदेश ST Bus corporation precaution for corona virus Coronavirus | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज, 'या' उपाययोजना करण्याचे आदेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/11201128/ST-Bus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोनाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याविषयी नागरिकांना सूचित केलं जातं आहे. महाराष्ट्राची विशेषतः ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवाशी, तसेच एसटीच्या चालक, वाहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर राज्यातील काही एसटी बस स्थानकांमध्ये उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ करण्यात यावीत. तसेच बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक करण्यात यावा. वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना, सॅनिटरी लिक्विडची एक बाटली देण्यात यावी, प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. याबरोबरच आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बसस्थानकावरील उद्घघोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी कोरोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. अशा महत्वपूर्ण सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून, प्रवाशांनी घाबरून न जाता, योग्य ती दक्षता घेऊन प्रवास करावा असे आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील बहुतांश बस स्थानक परिसरात अस्वच्छता, एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाजवळ असलेल्या स्वच्छतागृह घाणीच्या साम्राज्याने, दुर्गंधीने व्यापलेलं असल्याचं चित्र आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करत आहेत.संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)