Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2021 | रविवार | ABP Majha
देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मोदी सरकारच्या सत्तेची सात वर्षे पूर्ण, काँग्रेस नेते केंद्राविरोधात रस्त्यावर उतरणार; महागाई, बेरोजगारीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आंदोनाची हाक
2 . कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांना पीएम केअर योजनेअंतर्गत आर्थिक मदत, वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर स्टायपेंड
3. दररोज नोंदवल्या जाणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये 50 टक्क्यांची घट, तीन आठवड्यांत कोरोना रुग्ण दुपटीला काहीसा ब्रेक
4. रेमडेसिवीरचा पुरवठा थांबवण्याचा केंद्राचा निर्णय, मागणीपेक्षा पुरवठा जास्त, 50 लाख कुप्या राखीव साठा म्हणून कायम
5. राज्य सरकारची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात, आता तरी जागे व्हा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
6. लशीसाठी अभिनेत्री मीरा चोप्राकडून फ्रंटलाईन वर्करचं सोंग, बनावट ओळखपत्र बनवून ठाण्यात लस घेतल्याचा आरोप
7. पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 4 मुलांचा भीमेच्या पात्रात बुडून मृत्यू, दक्षिण सोलापुरातील घटना
8. डॉमिनिकाच्या कारागृहात मारहाण झाल्याचा मेहूल चोक्सीचा आरोप, कैद्याच्या वेशातील चोक्सीचा फोटो व्हायरल
9. जळगावात दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस; तोक्ते चक्रीवादळाप्रमाणे मदतीसाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती
10. राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मनमाडसह मराठवाड्यातही पाऊस