एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2019 | सोमवार
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, प्रचार सोडून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा बंडोबांशी फोनवरुन संवाद, भाजपसमोर 27 मतदारसंघात 144 बंडखोरांचं आव्हान
- परतीचा पाऊसही महाराष्ट्राला झोडपणार, 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यानच्या प्रचारावर वादळी पावसाचं सावट, काही तासांच्या पावसामुळं नाशकात पाणीच पाणी
- आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचं पत्र, सरन्यायाधीशांकडून विशेष दाखल
- राज ठाकरेंच्या पहिल्यावहिल्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, सभेच्या जागेसाठी मनसेचे शर्थीचे प्रयत्न, अलका चौकात सभा घेण्याचा मनसेचा इशारा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात नऊ सभा घेणार, 17 ऑक्टोबरला पुणे-साताऱ्यात सभा
- नोकरी-धंद्याची स्थिती आणखी बिकट होण्याची भारतीयांना भीती, आरबीआयच्या सर्वेक्षणादरम्यान नोंदवलं मतं, तर पुढच्या वर्षी स्थिती सुधारण्याची अनेकांना आशा
- महात्मा गांधींच्या अस्थी चोरुन फोटोखाली 'गद्दार' लिहिले, तुषार गांधींना अश्रू अनावर
- शुटिंग दरम्यान अपघात झालेल्या सहकलाकाराचा जीव वाचवण्यासाठी अक्षय कुमारची धाव, मनिष पॉल शो दरम्यानची दृश्य व्हायरल
- भुसावळमध्ये अंधाधुंद गोळीबारात पाच जणांची हत्या, भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारावर अज्ञातांचा गोळीबार, तीन संशयित ताब्यात
- टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय, शमी, जाडेजाची शानदार गोलंदाजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement