एक्स्प्लोर

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत

श्रीपाद छिंदम याला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून बडतर्फ करण्यात आले असून, उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा अहमदनगरमधील उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली. श्रीपाद छिंदम कारमधून जात असताना, नागरिकांनी पाठलाग केला. त्यानंतर कारमधून पळून छिंदम सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारातील अंधारात लपला. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं छिंदमला अटक केली. काय आहे प्रकरण? शिवजयंतीच्या तोंडावर अहमदनगरचं  वातावरण ढवळून निघालं आहे. महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. कारवाई श्रीपाद छिंदम याला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून बडतर्फ करण्यात आले असून, उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी यासंदर्भात पत्रक काढून घोषणा केली. पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत मोर्चा काढला. खासदार दिलीप गांधींच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्याही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. माफीनामा श्रीपाद छिंदम याने एका व्हिडीओद्वारे वादग्रस्त वक्तव्यासंबंधी माफीनामा जाहीर केला आहे. मात्र वातावरण आणखी चिघळण्याआधीच भाजपने सावध पावलं उचलत छिंदमला घरचा रस्ता दाखवला. श्रीपाद छिंदम नेमकं काय म्हणाला? अशोक बिडवे – हॅलो साहेब... श्रीपाद छिंदम – बिडवे, काल माणसं आले नाही बरं का... अशोक बिडवे – काल किन्नर साहेब बोलले ना तुम्हाला, मी पण त्यांना बोललो होतो. श्रीपाद छिंदम – पाठवणार आहे, का नाही तेवढं सांग फक्त. बाकी कोणाचं नाव नको सांगू. अशोक बिडवे – बरं.. बरं.. पाठवतो. हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब... श्रीपाद छिंदम – ते गेलं ##$%@##... तू काय शिवाजीच्या ##$%@##? अशोक बिडवे – अहो साहेब... सकाळी सकाळी चांगलं बोला... श्रीपाद छिंदम – मग... अशोक बिडवे – असं बोलतात काय सर.. तुम्हाला बोलतोय ना की माणसं नाहीयेत,  शिवजयंती होऊ द्या... श्रीपाद छिंदम – माझं घरचं काम आहे ते... अशोक बिडवे – मग तुम्ही नीट बोला ना राव... श्रीपाद छिंदम – मग एक काम कर ना... शिवजयंतीचा इतका पुळका आहे, तर एक-दोन माणसं वाढून घे ना पालिकेतून... अशोक बिडवे – माणसं नाहीत म्हणून... पण तुमचं काम केलं नाही का कधी? श्रीपाद छिंदम – माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू.... संबंधित बातमी : नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Embed widget