एक्स्प्लोर

नितेश राणेंची भाषा शरद पवारांनाही खटकली; थेट प्रहार करत म्हणाले, "सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागतं"

नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री याच्या पुढच्या पिढीने केलेली नाही. सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय, असे शरद पवार म्हणाले

 रत्नागिरी :  रत्नागिरीतल्या चिपळूण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar)  वेगवेगळ्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. मालवणमधील महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या स्पष्टीकरणावरून शरद पवारांनी आसूड ओढले. मुंबई-गोवा हायवेसह राज्यातल्या इतर रस्त्यावरून पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. सत्ता डोक्यात गेलेल्यांना भानावर आणावं लागलं अशा शब्दात शरद पवारांनी राणे पितापुत्रांवर प्रहार केलाय.  

शरद पवार म्हणाले, महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं आहे.  भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोहचला याच हे उदाहरण  आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नौदलाकडून तयार केला असं सरकारकडून सांगण्यात आलं.  वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्य सरकार सांगत आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कधीही धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गमधला पुतळा वाऱ्याने पडला असे सांगतात.

भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत : शरद पवार 

कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका केली आहे.  शरद पवार म्हणाले,  आयुष्यात  अशा पद्धतीचा रस्ता कधीही पाहिला नाही. एखादा जर पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटलमध्ये पोहचणार नाही. तीन वेळा दुरुस्त करुन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पुण्यात ज्या खड्ड्यात  ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला आहे.  याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेल्या नाहीत, असे शरद पवार म्हणाले. 

सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय : शरद पवार

नारायण राणेंवर देखील शरद पवारांनी निशाणा  साधला केला आहे. शरद पवार म्हणाले,  नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री यांच्या पुढच्या पिढीने केलेली नाही. सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते तेव्हा त्यांना भानावर आणावं लागते.  सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते.

महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली : शरद पवार

400  पार म्हणणाऱ्या मोदींना जनतेनं 240 जागा दिल्या आहेत.  आज नितिश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या दोन पक्षांची मदत घेतली नसती तर सरकार बनल नसतं. तरीही यांना अजून समज येत नाही.  महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली .  प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहा, असेही शरद पवार म्हणाले.  

हे ही वाचा :

मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, भिडा म्हटल तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Patil Pune Speech : पुणे मेट्रो उद्घाटन सोहळा कार्यक्रमात पाटील यांचा विरोधकांना टोलाManoj Jarange :ठाकरे, मुंडेंनंतर जरांगेंचाही दसरा मेळावा? नारायणगडावर हजर राहण्याचे संकेतChhagan Bhujbal Pune Speech : सावित्रीबाईंच्या कामाचा उजाळा; छगन भुजबळ यांचं पुण्यात भाषणNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वंदे भारतला हिरवा झेंडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"
Nilesh Lanke : 'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!
'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!
Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Embed widget