एक्स्प्लोर

मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, भिडा म्हटल तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले

रस्ता बंद केलाय काही फरक पडत नाही.  ते रस्ते भुजबळ आणि फडणवीस यांनी बंद केले आहेत,त्यांचं तोंड बघू नये, असे मनोज जरांगे म्हणाले.

मुंबई मराठा आंदोलक (Maratha Reservation)  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)   मागील  दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणस्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले. पण वडीगोद्री या गावात त्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर  मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी इशारा दिला आहे.मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे. मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी रस्ता बंद केलाय काही फरक पडत नाही.  ते रस्ते भुजबळ आणि फडणवीस यांनी बंद केले आहेत,त्यांचं तोंड बघू नये. तुम्ही आमच्या तरुणांना मारले आहे, शेवट मी आंदोलन संपल्यावर करेल . मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा आहे.  त्यांनी रस्ता बंद केला तो महामार्ग आहे हेच मराठा समाजाने केले असते तर मराठे जातियवादी म्हटले असते. मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत .

 छगन भुजबळला दंगल घडवायच्या आहेत : मनोज जरांगे

 छगन भुजबळला दंगल घडवायची आहे. त्यांना  पोलिसांच्या काठ्या खायच्या आहेत.  त्यांनी सुरुवात केलीय, शेवट मी करणार आहे.  ओबीसी मराठा वाद नाही, गावखेड्यात एक आहे. तिथला PI (पोलीस निरीक्षक)ला पण मस्तीत आलाय, जातीवाद करत आहे, आपल्या मुलांना त्रास देत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.  

जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार : संभाजीराजे

जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार, अंतरवालीच्या व्यासपीठावरून संभाजीराजेंनी इशारा दिला आहे.   संभाजीराजे म्हणाले,  जरांगे यांचा जीव महत्त्वाचा आहे.  तब्येत खालावत आहे आणि सरकार एअर कंडीशनमध्ये बसले आहे.  विरोधी पक्ष सुद्धा नुसत बघ्याची भूमिका घेत आहे.  आज कॅबिनेट आहे,हो ना किंवा नाही निर्णय घेऊन  टाका . सरकारला माझी सूचना आहे, मेडिकल रिपोर्ट घ्या..  तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर तुमचा सरकारमध्ये राहून काय उपयोग? विरोधी पक्ष सुद्धा निवडणुकीची वेळ आली म्हणून आत येत नाही. तुम्ही आश्वासन दिले होते, हे करतो ते करतो, गुलाल लाऊन घेतला होता, सरकार ने यावर भाष्य करायला पाहिजे.शिवाजी महाराजांनी सर्वांना न्याय दिला राजश्री शाहू महाराजांनी सर्वांना न्याय दिला होता त्यात मराठा समाज देखील होता.

मराठवाडा आज बंद 

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज मराठवाड्यामध्ये तीन ठिकाणी बंद पाळण्यात येतोय नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येत आहे. काल परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. आज देखील विविध मराठा संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे.  या ठिकाणी बंदचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय.  तिकडे नांदेड शहर आणि नायगाव मध्ये देखील बंदची हाक देण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यात देखील मराठा संघटनांच्या वतीने बंदची  हाक देण्यात आली  असून दुसरीकडे ओबीसीकडून धनगर आणि बंजारा समाजाचे देखील ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Akshay Shinde Encounter : विरोधकांचे गंभीर आरोप; अक्षय शिंदे एन्काऊंटरची बदलापूर फाईलAditya Thackeray On Shinde Encounter : 'त्याला फाशीच व्हायला हवी होती, मात्र जे घडलं ते हलगर्जीपणा'Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवालAkshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
Embed widget